Pandhrinath Phadke बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरी शेठ फडके यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2024 17:07 IST2024-02-21T15:37:07+5:302024-02-21T17:07:03+5:30
आज 21 फेब्रुवारी रोजी त्यांचं रुग्णालयात निधन झाले.

Pandhrinath Phadke बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरी शेठ फडके यांचे निधन
-मयुर तांबडे
नवीन पनवेल : बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरी शेठ फडके यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
बैलगाडा शर्यतींचा विषय निघाल्यानंतर पहिलं नाव येते ते म्हणजे विहिघर येथील प्रसिद्ध पंढरीनाथ फडके. त्यांचे आज निधन झाले आहे. 1986 पासून वडिलांमुळे पंढरीनाथ फडकेंना बैलगाडीचा नाद लागला. शर्यत जिंकल्यावर कोंबडा किंवा मेंढा मिळायचा तरीही शर्यत जिंकायची क्रेझ वेगळी होती. तिथपासून सुरू झालेली आवड फडकेनी राखून ठेवली होती. आत्तापर्यंत 40 ते 50 शर्यतींची बैल त्यांनी राखून ठेवली होती.
आज 21 फेब्रुवारी रोजी त्यांचं रुग्णालयात निधन झाले. कोणत्याही शर्यतीमध्ये एक नंबरला असलेला बैल पळायला लागला आणि त्याच्यावर पंढरीशेठ यांची नजर असायची. त्यानंतर कितीही किंमत असली तरी त्याला विकत घ्यायचे. त्यांच्याकडे महाराष्ट्रातील टॉपचा समजला जाणारा बादल बैल याने तब्बल 11 लाख रुपयांची शर्यत जिंकली होती. आज 21 फेब्रुवारी रोजी त्यांचे निधन झालं. पंढरी फडके यांना गोल्डन मॅन म्हणून ओळखले जायचे.