अविनाश जाधव मनसे ठाणे शहराध्यक्षपदी
By Admin | Updated: January 18, 2015 00:56 IST2015-01-18T00:56:31+5:302015-01-18T00:56:31+5:30
लोकसभा, विधानसभेतील धोबीपछाडनंतर ठाणे शहर मनसेमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.

अविनाश जाधव मनसे ठाणे शहराध्यक्षपदी
ठाणे : लोकसभा, विधानसभेतील धोबीपछाडनंतर ठाणे शहर मनसेमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. शहराध्यक्ष नीलेश चव्हाण यांची उचलबांगडी करत त्यांच्या जागी अविनाश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. तर शहर संपर्कप्रमुखपदी गिरीश धानुरकर यांच्या जागी अभिजित पानसे यांची नियुक्ती झाली आहे. महापालिकेच्या २०१२च्या निवडणुकीपासून ठाणे शहर मनसेची वाताहत सुरू झाली होती. त्याचे पडसाद लोकसभा निवडणुकीतही दिसून आले. त्याचीच पुनरावृत्ती विधानसभेतही झाल्याने हा निर्णय घेण्यात आला. (प्रतिनिधी)