शुभ गटणी रायगडचा कर्णधार
By Admin | Updated: December 12, 2015 01:45 IST2015-12-12T01:45:57+5:302015-12-12T01:45:57+5:30
महाराष्ट्र क्रि केट असोसिएशनतर्फेघेण्यात येणाऱ्या १४ वर्षांखालील मुलांच्या क्रि केट स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या रायगड जिल्हा संघाच्या

शुभ गटणी रायगडचा कर्णधार
अलिबाग : महाराष्ट्र क्रि केट असोसिएशनतर्फेघेण्यात येणाऱ्या १४ वर्षांखालील मुलांच्या क्रि केट स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या रायगड जिल्हा संघाच्या कर्णधारपदी कर्जतचा शुभ गटणी याची निवड करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी व मालवण येथे ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रायगडचा संघ सिंधुदुर्गला रवाना झाला. पनवेल येथील सागर कांबळे याची संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. या संघाचे प्रशिक्षिक सागर कांबळे हे आहेत. रायगड जिल्हा क्रि केट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते, कार्याध्यक्ष प्रदीप नाईक, कार्यउपाध्यक्ष जयंत नाईक आदींनी या संघास शुभेच्छा दिल्या. (प्रतिनिधी)