खंडणी मागणारा अटकेत
By Admin | Updated: September 5, 2015 23:16 IST2015-09-05T23:16:43+5:302015-09-05T23:16:43+5:30
बांधकाम व्यासायिक म्हणून कार्यरत असणा-या सनी लोहारीया याच्याकडे खंडणीची मागणी करणा-या आरोपी करीम मुनीर श्ोख या आरोपीला वाशी पोलिसांनी अटक केली आहे.

खंडणी मागणारा अटकेत
नवी मुंबई : बांधकाम व्यासायिक म्हणून कार्यरत असणा-या सनी लोहारीया याच्याकडे खंडणीची मागणी करणा-या आरोपी करीम मुनीर श्ोख या आरोपीला वाशी पोलिसांनी अटक केली आहे. जोगेश्वरी येथे राहणा-या करीम याला यापुर्वीही अनेक गुन्हयांमध्ये अटक केली असून त्याने शिक्षाही भोगली आहे.
शहरातील बांधकाम व्यावसायिक सुनिलकुमार लोहारीया यांचा मुलगा सनी लोहारीया याला गेल्या काही दिवसांपासून आरोपी करीम शेख यांच्याकडून खंडणीसाठी मागणी करण्यात येत होती. सुनिलकुमार लोहारीया यांच्या हत्येमागे आपलाच हात असल्याचे दाखवत आरोपीने सनीकडून पैशांची मागणी केली तसेच आपल्याला फक्त पैसे हवे असून तुला मारणार नाही असे आश्वासन दिले. आरोपी लोहारीया याला भेटण्यासाठी त्याच्या वाशी येथील कार्यालयात गेला असता लोहारिया यांच्या अंगरक्षकाने त्या आरोपीला पकडले आणि वाशी पोलिस स्थानकात दाखल केले. आरोपी कासीम शेख याच्या चौकशी दरम्या सुनिल लोहारीया यांच्या मारेकऱ्यांशी आपल्या कसलाही संबंध नसल्याची कबुली दिली. (प्रतिनिधी)