अटक आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

By Admin | Updated: October 12, 2016 05:00 IST2016-10-12T05:00:41+5:302016-10-12T05:00:41+5:30

सराईत सोनसाखळी चोराने पोलीस कोठडीत असताना शौचालयाच्या खिडकीच्या काचाने स्वत:चा गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न केला. तीन दिवसांपूर्वी त्याला

Attempted suicide of the accused arrested | अटक आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

अटक आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

नवी मुंबई : सराईत सोनसाखळी चोराने पोलीस कोठडीत असताना शौचालयाच्या खिडकीच्या काचाने स्वत:चा गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न केला. तीन दिवसांपूर्वी त्याला नेरुळ पोलिसांनी अटक केली असून गुरुवारपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान या प्रकारात त्याच्या गळ्यावर दुखापत झाली असून त्याला जे.जे. रूग्णालयात दाखल केले आहे.
आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या या आरोपीचे नाव नजीर अहमद खान (३२) असे आहे. तो खारघरचा राहणारा असून सराईत सोनसाखळी चोर आहे. तीन दिवसापूर्वी त्याला नेरुळ पोलिसांनी नाकाबंदीत पकडून अटक केली होती. त्याने आयुक्तालय क्षेत्रात अनेक ठिकाणी सोनसाखळी चोरीचे गुन्हे केल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक ठिकाणी सीसीटीव्हीमध्ये देखिल त्याचे कृत्य कैद झालेले आहे.
नेरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याचा दहापेक्षा अधिक गुन्ह्यात समावेश असल्याची शक्यता आहे. सोमवारी शौचालयात गेल्यानंतर त्याने त्याठिकाणच्या खिडकीची काच फोडून गळ्यावर जखम करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर त्याला तत्काळ वाशीतील महापालिका रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु किरकोळ दुखापत असल्यामुळे उपचारानंतर त्याला पुन्हा पोलीस ठाण्यात नेत असताना त्याने अस्वस्थ वाटत असल्याचे पोलिसांना सांगितले. यामुळे त्याला मुंबईच्या जे.जे. रूग्णालयात दाखल केल्याचे वरिष्ठ निरिक्षक अधिकराव पोळ यांनी सांगितले. नजीर खान हा सराईत गुन्हेगार असून चौकशी व चोरीचा मुद्देमाल देण्याचे टाळण्यासाठी त्याने आत्महत्येचा बनाव केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. (प्रतिनिधी)

Web Title: Attempted suicide of the accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.