ज्वेलर्समध्ये दरोड्याचा प्रयत्न फसला

By Admin | Updated: January 8, 2015 00:43 IST2015-01-08T00:43:06+5:302015-01-08T00:43:06+5:30

धारदार शस्त्राचा धाक दाखवून त्यांनी सोने लुटण्याचा प्रयत्न करताना दुकानातील कामगारांनी प्रतिकार केल्याने चोरट्यांना पकडण्यात आले.

The attempt of dragon in the jewelers is unsuccessful | ज्वेलर्समध्ये दरोड्याचा प्रयत्न फसला

ज्वेलर्समध्ये दरोड्याचा प्रयत्न फसला

नवी मुंबई : धारदार शस्त्राचा धाक दाखवून त्यांनी सोने लुटण्याचा प्रयत्न करताना दुकानातील कामगारांनी प्रतिकार केल्याने चोरट्यांना पकडण्यात आले. हा थरार कामोठे येथील कामोठे सेक्टर १९ येथील कलश ज्वेलर्समध्ये मंगळवारी रात्री घडला.
दुकानात दोन कामगार एकटेच असल्याची संधी साधून तीन व्यक्ती ग्राहक बनून तेथे आल्या. दुकानाची टेहाळणी केल्यानंतर त्यांनी आपल्याकडील चाकू काढून दुकानातील राजेंद्रसिंह खरवट व नरेश खरवट यांना धमकावले. शिवाय दुकानाचे शटर आतून बंद करुन दुकानातील सोने लुटण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. मात्र यावेळी दोघा खरवट बंधूंनी त्यांना प्रतिकार केल्याने त्यांच्यावर चाकूचे वार करुन चोरट्यांनी पळ काढला. परंतु यावेळी सतर्क झालेल्या नागरिकांनीही खरवट यांच्या मदतीला धाव घेतल्याने नानसिंग (२८) याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर बुधवारी भैरवनाथ याला तुर्भे येथून अटक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The attempt of dragon in the jewelers is unsuccessful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.