आक्षेपार्ह मजकूर प्रकरणी अटक
By Admin | Updated: April 8, 2016 01:46 IST2016-04-08T01:46:21+5:302016-04-08T01:46:21+5:30
पालीतील एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर महंमद पैगंबरांवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याप्रकरणी पाली पोलिसांनी एकाला अटक केली असून अन्य ग्रुप मेंबर्सला समज देवून सोडण्यात आले

आक्षेपार्ह मजकूर प्रकरणी अटक
पाली : पालीतील एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर महंमद पैगंबरांवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याप्रकरणी पाली पोलिसांनी एकाला अटक केली असून अन्य ग्रुप मेंबर्सला समज देवून सोडण्यात आले.
पालीतील एका बलम पिचकारी नावाच्या गु्रपमधील मुकेश कुमार यांनी हा सदरचा आक्षेपार्ह मजकूर या ग्रुपवर पाठवला. त्यामुळे याच गु्रपमधील सदस्य फिरोज पानसरे यांनी तो वाचल्यानंतर यावर आक्षेप घेऊन पालीतील सर्व मुस्लीम बांधवांनी याबाबत गुन्हा नोंदविला असून त्यावरील पुढील तपास पाली पोलीस करीत आहेत. या सर्व घडामोडींमध्ये पालीतील मुस्लीम समाजाचे अध्यक्ष सलाम पानसरे यांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले. सुधागडचे तहसीलदार निंबाळकर, पोलीस निरीक्षक पवार यांच्याकडे दोषींवर कार्यवाही होण्यासाठी निवेदन दिले आहे.