नवी मुंबई पालिकेच्या अधिका:यांवर अॅट्रॉसिटी
By Admin | Updated: October 31, 2014 00:28 IST2014-10-31T00:28:28+5:302014-10-31T00:28:28+5:30
महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांसह तीन अधिका:यांवर सीबीडी पोलिसांत अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. पालिकेतील कंत्रटी कामगाराच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे.

नवी मुंबई पालिकेच्या अधिका:यांवर अॅट्रॉसिटी
नवी मुंबई : महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांसह तीन अधिका:यांवर सीबीडी पोलिसांत अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. पालिकेतील कंत्रटी कामगाराच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागात काम करणा:या सतीश औसरमळ या कर्मचा:यास काही वर्षापूर्वी कामावरून कमी करण्यात आले होते. सदर कर्मचा:याने महापालिकेचे विद्यमान अतिरिक्त आयुक्त संजय पत्तीवार व इतर दोन अधिका:यांनी वारंवार कामावरून कमी केले, मानसिक त्रस देवून जातीयवादी वागणूक दिल्याची तक्रार केली होती. याविषयी संबंधित तीन अधिका:यांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला जावा यासाठी वाशी न्यायालयामध्ये धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर याविषयी सीबीडी पोलीस स्टेशनमध्ये गुरुवारी संबंधित तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. (प्रतिनिधी)
याविषयी संजय पत्तीवार यांनी सांगितले की, काही वर्षापूर्वी कामावरून कमी केल्यामुळे सदर कंत्रटी कामगाराने कामगार न्यायालय व मागासवर्गीय आयोगात तक्रार केली होती. परंतु त्या ठिकाणी तक्रारीमध्ये तथ्य आढळून आले नव्हते. आता या कर्मचा:याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला असेल तर त्याची अद्याप सविस्तर माहिती नाही. सविस्तर माहिती घेवून पोलीस व न्यायालयात योग्य बाजू मांडली जाईल असे स्पष्ट केले.