शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

उरणमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 05:56 IST

कळंबुसरे येथील रायगड जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतील मुलींवरच स्थानिक शालेय शिक्षण समितीच्या सभापतीने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

उरण : कळंबुसरे येथील रायगड जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतील मुलींवरच स्थानिक शालेय शिक्षण समितीच्या सभापतीने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून नारायण पाटील (४२) याला अटक केली आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थ व पालकांनी मुख्याध्यापकांंना घेराव घातला.उरण तालुक्यातील कळंबुसरे येथे रायगड जिल्हा परिषदेची मराठी शाळा आहे. पहिली ते पाचवीपर्यंत शिक्षण घेण्याची व्यवस्था असलेल्या या शाळेत ८० मुले-मुली शिक्षण घेत आहेत. यामध्ये ३८ मुलींचा समावेश आहे.१३ एप्रिल रोजी शालेय शिक्षण समितीचा सभापती नारायण पाटील याने दुसरीत शिकणाऱ्या सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलीने घरी जाऊन आईला घडलेला प्रकार सांगितला. याबाबत जाब विचारण्यासाठी पीडितेचे पालक पाटील यांच्या घरी गेले असता त्यांनी दमदाटी करीत हुसकावून लावले. अखेर मुलीच्या आईने सोमवार, १५ एप्रिल रोजी उरण पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली.उरण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांनीतक्रारीची दखल घेत पाटील यांना पॉक्सो व विविध कलमांखाली अटक केली. याआधीही पाटीलने आठ ते दहा मुलींवर अत्याचार केला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.>मुख्याध्यापकांना घातला घेराव!शाळेच्या मुख्याध्यापिका वनिता खुंटले अन्य शिक्षक तसेच कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवून घेण्याचे काम सुरू आहे. घडलेल्या प्रकारामुळे संतप्त ग्रामस्थ आणि पालकांनी मुख्याध्यापकांंना घेराव घातला.

टॅग्स :Molestationविनयभंग