शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आईचे पैसे चोरल्याच्या संशयातून हल्ला; नेरूळमध्ये हाणामारी, दोघांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 14:25 IST

याप्रकरणी साहिल परघरमोर (२२), विनोद कांबळे (१९) यांना अटक केली असून, आणखी एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक तानाजी भगत यांनी दिली.

नवी मुंबई : आईचे पैसे चोरल्याच्या संशयातून नेरूळ येथे एका तरुणावर टोळक्याने सशस्त्र हल्ला केल्याची घटना घडली होती. यावेळी ‘पार्किंग’मधील कर्मचारी व इतरांच्या मदतीने जखमींचे प्राण वाचले होते, तर हल्ला करणाऱ्या एकाला पकडले होते. हे सर्वजण चेंबूरचे असून, केवळ हल्ल्याच्या उद्देशाने एकाचा पाठलाग करत रेल्वेने नेरूळला आले होते. 

    याप्रकरणी साहिल परघरमोर (२२), विनोद कांबळे (१९) यांना अटक केली असून, आणखी एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक तानाजी भगत यांनी दिली. नेरूळ रेल्वे स्थानकाबाहेरील पार्किंगमध्ये शनिवारी रात्री ही घटना घडली. तेथे हर्ष खरे (२०) याच्यावर काहीजण कोयता, दांडके व दगडाने हल्ला करीत होते. त्यामुळे हर्ष बचावासाठी धावत एका वाहनाखाली घुसला. तेथेही हल्लेखोर त्याच्यावर वार करीत होते. हा प्रकार पाहून तिथल्या ‘पे ॲण्ड पार्किंग’मध्ये काम करणाऱ्या मुकीम उस्मानी याने आरडाओरडा करत त्याच्या बचावासाठी धाव घेतली. 

कायमचा काटा काढण्याचा होता डाव  हर्ष याने आपल्या आईचे पैसे चोरून तिची छेड काढल्याचा साहिल याचा आरोप आहे. याप्रकरणी नेहरूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल आहे. मात्र, या प्रकरणात साहिल हा हर्षचा कायमचा काटा काढण्याच्या प्रयत्नात होता. त्यासाठी तो संधीच्या शोधात असताना शनिवारी रात्री हर्ष हा पनवेलकडे जाणाऱ्या लोकलमध्ये चढताना दिसला.   याचवेळी साहिलदेखील त्याच्या साथीदारांसह बॅगेत कोयता घेऊन त्याच लोकलमधून त्याच्या पाठोपाठ आला होता. नेरूळ स्थानकात हर्ष उतरून स्थानकाबाहेर निघताच साहिल व त्याच्या साथीदारांनी त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. मात्र, नागरिकांच्या विरोधामुळे थोडक्यात हर्षचे प्राण वाचले.

 हल्ला झाला त्यावेळी इतर नागरिक धावून आले. हल्लेखोर पळू लागले. यामुळे मुकीम याने पळणाऱ्या एकाच्या दिशेने बांबू फेकून त्याला पाडून पकडून ठेवले. या घटनेनंतर पोलिसांनी हर्ष याला रुग्णालयात दाखल केले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस