आंब्याच्या ५ लाख पेट्यांची आवक घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 23:32 IST2020-06-02T23:32:23+5:302020-06-02T23:32:52+5:30
कोरोनामुळे शेतकऱ्यांचे नुकसान : चार महिन्यांत फक्त ३ लाख ६७ हजार पेट्यांचीच आवक; गतवर्षी आल्या ८ लाख ७२ हजार पेट्या

आंब्याच्या ५ लाख पेट्यांची आवक घटली
नामदेव मोरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : कोरोनामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. गतवर्षी फेब्रुवारी ते मे पर्यंत मुंबई बाजारसमितीमध्ये तब्बल ८ लाख ७२ हजार पेट्यांची आवक झाली होती. यावर्षी फक्त ३ लाख ६७ हजार पेट्यांचीच आवक झाली असून तब्बल ५ लाख ४५२३ पेट्यांनी आवक घटली आहे.
मुंबई बाजारसमितीच्या फळ मार्केटमध्ये चार महिने फळांच्या राजाचे राज्य सुरू असते. मार्केटमध्ये सर्वत्र फक्त आंबाच विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे चित्र पहावयास मिळत असते. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील हापूस आंब्यासाठीही मुंबई हीच देशातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. याशिवाय येथून सर्वाधीक निर्यातही होत असते. बाजारसमितीमधील व्यापारी व शेतकºयांचे तीन ते चार पिढ्यांपासून ऋणाणुबंद निर्माण झाले आहेत. शेतकरीही मोठ्या विश्वासान आंबा मुंबईत पाठवत असतो. कोकण व्यतिरिक्त कर्नाटक, गुजरात व इतर ठिकाणावरून आंबाही मुंबईत येत असतो. मागील काही वर्षामध्ये दक्षीण पूर्व अफ्रिीकेतील मलावी देशातूनही आंबा डिसेंबरमध्ये मुंबईत येऊ लागला आहे. प्रत्येक वर्षी ५०० कोटीपेक्षा जास्त उलाढाल मुंबईत होत असते. यावर्षी ३१ जानेवारीला हापूसची पहिली पेटी मार्केटमध्ये दाखल झाली. गतवर्षीपेक्षा उशीरा पहिली पेटी आल्यामुळे मार्चच्या दुसºया आठवड्यात नियमीत हंगाम सुरू होईल असा अंदाज होता. परंतु कोरोनामुळे सर्व अंदाज धुळीस मिळाले.
मुंबईमधील सर्व व्यवहार बंद झाले. बाजारसमितीमधील फळ मार्केटही अनेक दिवस बंद ठेवावे लागले. या सर्वांचा परिणाम व्यापारावर होऊन आंबा उत्पादक शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
फेब्रुवारी महिन्यात गतवर्षी ६२५२ पेटीची आवक झाली होती. यावर्षी त्यामध्ये वाढ हाऊन ७४७८ पेट्यांची आवक झाली. मार्चमध्ये मात्र गतवर्षी ७७५९४ पेटी आवक झाली होती. यावर्षी फक्त ३१४४३ पेट्यांचीच आवक झाली. फेब्रुवारी ते ३१ मे दरम्यान गतवर्षी तब्बल ८ लाख ७२ हजार पेट्यांची आवक झाली. यावर्षी फक्त ३ लाख ६७ हजार पेट्यांचीच आवक झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये तब्बल ५ लाख ४ हजार पेटी आवक कमी झाली आहे. कोरोनामुळे शेतकºयांना माल पाठविता आला नाही.
एपीएमसीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे व्यापारी व कामगारांमध्येही भितीचे वातावरण निर्माण झाले होते. हवाईमार्र्गे होणारी निर्यातही बंद होती. शासनाने प्रयत्न करून समुद्र मार्गे निर्यात सुरू ठेवली परंतु त्याचे प्रमाणही कमी होते. या सर्वांमुळे आंबा उत्पादक शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
कोरोनामुळे या वर्षी आंबा हंगामावर परिणाम झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये खूपच कमी उलाढाल झाली असून शेकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
संजय पानसरे
संचालक, फळ मार्केट