लूटमार करणाऱ्या मोलकरणीला अटक

By Admin | Updated: August 7, 2016 03:24 IST2016-08-07T03:24:09+5:302016-08-07T03:24:09+5:30

घरकामासाठी नोकरी मिळवुन संधी साधुन लुटमार करणारया मोलकरनीला एनआरआय पोलीसांनी अटक केली आहे. तिच्याकडून नुकत्याच घटनेत चोरीला गेलेला मुद्देमाल देखिल

Arrested for robbery | लूटमार करणाऱ्या मोलकरणीला अटक

लूटमार करणाऱ्या मोलकरणीला अटक

नवी मुंबई : घरकामासाठी नोकरी मिळवुन संधी साधुन लुटमार करणारया मोलकरनीला एनआरआय पोलीसांनी अटक केली आहे. तिच्याकडून नुकत्याच घटनेत चोरीला गेलेला मुद्देमाल देखिल जप्त करण्यात आला आहे. वाशी रेल्वेस्थानकाच्या आवारात प्रियकरासह आली असता ती पोलीसांच्या जाळ्यात अडकली.
श्वेता हडप्पन (२०) असे अटक केलेल्या तरुणीचे नाव आहे. सिवुड सेक्टर ४४ए मधील सखुमोरेश्वर अपार्टमेंटमध्ये ती नोकरीच्या बहाण्याने गेली होती. यावेळी सुरक्षा रक्षकाकडे चौकशी केल्यानंतर त्याच सोसायटीत राहणारया अर्चना मलान यांना मोलकरनीची गरज असल्याचे तिला समजले. यानुसार तिने मलान यांची भेट घेवुन घरकामासाठी नोकरी मिळवली होती. यादरम्यान मलान यांनी तिच्याकडे परिचय पत्राची मागणी केली असता दोन दिवसात देते असे सांगितले होते. त्यापुर्वीच मलान ह्या घराबाहेर गेल्या असता अवघ्या अर्ध्या तासात तिने घरात चोरी करुन पलायन केले होते. रोख रक्कम व हिरेजडीत सोन्याचे दागिणे असा सुमारे २१ लाख ५२ हजार रुपये किमतीचा ऐवज घेवुन ती फरार झाली होती. याप्रकरनी एनआरआय पोलीसठाण्यात गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर तपासादरम्यान एका सिसिटीव्हीमध्ये ती दिसुन आली. त्याद्वारे तीची ओळख पटवण्यासाठी उपआयुक्त प्रशांत खैरे, सहाय्यक आयुक्त धनराज दायमा, वरिष्ठ निरिक्षक शेखर बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथके तयार करण्यात आली होती. तिचे छायचित्र इतर ठिकाणच्या पोलीसांकडे पाठवली असता, तिचे नाव व कर्नाटकचा पत्ता मिळाला. परंतु त्याठिकाणी पोलीसांचे पथक गेले असता, ती तिकडे येवुन परत मुंबईला गेल्याचे समजले.
अखेर वाशी रेल्वेस्थानक आवारात प्रियकराच्या भेटीसाठी ती आली असता, पोलीसांनी सापळा रचुन तिला ताब्यात घेतले. अंग झडतीमध्ये तिच्याकडे मलान यांच्या घरातुन चोरलेले काही दागिणे आढळून आले. यानुसार तिला अटक करुन तिच्याकडून चोरीचे दागिणे व रोख रक्कम असा १ लाख ५० हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे. तिने अशाच प्रकारे इतर अनेक ठिकाणी लुटमारी केल्याची कबुली एनआरआय पोलीसांना दिली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Arrested for robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.