गांजा विक्रीप्रकरणी महिलेला अटक
By Admin | Updated: February 14, 2017 04:32 IST2017-02-14T04:32:45+5:302017-02-14T04:32:45+5:30
गांजा विक्रीप्रकरणी एपीएमसी पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. धान्य मार्केटसमोरील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या

गांजा विक्रीप्रकरणी महिलेला अटक
नवी मुंबई : गांजा विक्रीप्रकरणी एपीएमसी पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. धान्य मार्केटसमोरील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या या महिलेकडून ७०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.
एपीएमसी पोलीस व अमली पदार्थ विरोधी पथकाने एपीएमसी आवारात कारवाईचा धडाका लावलेला आहे. यापूर्वी त्यांच्याकडून हरिभाऊ विधाटे ऊर्फ टारझन याच्यासह अशोक पांडे या गुन्हेगाराला अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्यावरील कारवाईनंतरही मार्केट आवारात गांजाची विक्री होत असल्याची माहिती एपीएमसी पोलिसांना मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रफुल्ल भिंगार्डे, सहाय्यक निरीक्षक यू. के. ढमाळे यांच्या पथकाने तपासाला सुरवात केली. तेव्हा कविता कराळे गांजाची विक्री करत असल्याची माहिती त्यांना मिळाली. (प्रतिनिधी)