शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

विदेशी तरुणीचा विनयभंग करणाऱ्याला अटक, गुन्हे शाखेची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 6:27 AM

रेल्वेच्या जनरल डब्यात विदेशी तरुणीचा विनयभंग करणाºया तरुणाला रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.

नवी मुंबई : रेल्वेच्या जनरल डब्यात विदेशी तरुणीचा विनयभंग करणाºया तरुणाला रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. अय्याज कुरेशी (२६) असे त्याचे नाव असून, तो मानखुर्दचा आहे. तक्रारदार तरुणीने मोबाइलने फोटो काढल्याने त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याला कुर्ला रेल्वे स्थानकातून अटक करण्यात आली.११ सप्टेंबर रोजी वाशी ते मानखुर्द दरम्यान लोकलमध्ये हा प्रकार घडला होता. देवनारच्या टाटा सामाजिक विज्ञान केंद्रात शिक्षण घेण्यासाठी फिनलँड येथून आलेली तरुणी व तिच्या मैत्रिणीसोबत हा प्रकार घडला होता. या दोघींनी वाशी रेल्व ेस्थानकातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सकडे जाणारी लोकल पकडली होती; परंतु महिलांच्या डब्याऐवजी घाईमध्ये विदेशी तरुणीने जनरल डब्यात प्रवेश केला होता, त्या वेळी एका तरुणाने तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला होता. या वेळी तिने मोबाइलने त्याचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला असता, दोघांमध्ये भांडणही झाले; परंतु संपूर्ण प्रकार सुरू असताना तिथे उपस्थित एकाही प्रवाशाने तिच्या मदतीला धाव घेतली नाही, असाच प्रकार वेगळ्या डब्यातून प्रवास करणाºया मणिपूरच्या तिच्या मैत्रिणीसोबतही घडला. या प्रकरणी त्यांनी वरिष्ठांना कळवले असता, वाशी रेल्वे पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती.त्यानुसार रेल्वे पोलीस उपआयुक्त पुरुषोत्तम कराड यांनी गुन्हे शाखेचे पथक तयार केले होते. त्यांनी विदेशी महिलेने मोबाइलने काढलेल्या फोटोच्या आधारे वाशी ते कुर्ला स्थानकातील सीसीटीव्ही तपासले होते. या वेळी तक्रारदार तरुणीने नोंदविलेल्या तक्रारीनुसार आणि छायाचित्रानुसार आरोपी कुर्ला स्थानकात वारंवार दिसून आला. या वेळी अय्याजची ओळख पटली.