रिक्षाचालकाकडून खंडणीखोरांना चाप
By Admin | Updated: December 9, 2014 01:11 IST2014-12-09T01:11:38+5:302014-12-09T01:11:38+5:30
लांब अंतराचे भाडे आकारणा:या रिक्षाचालकाकडून अवैधरीत्या पैसे वसूलणा:या चौघांच्या मुलुंड नवघर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

रिक्षाचालकाकडून खंडणीखोरांना चाप
मुलुंड : लांब अंतराचे भाडे आकारणा:या रिक्षाचालकाकडून अवैधरीत्या पैसे वसूलणा:या चौघांच्या मुलुंड नवघर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. विशाल जाधव, दीपक मानकर, अरविंद माने आणि सुनील वैती यांना खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून हे चौघेही रिक्षाचालक आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपनगरातील दूरचे भाडे नेणा:या रिक्षाचालकांकडून ही मंडळी प्रतिदिन 2क् रुपयांनुसार हप्ता वसुली करत होती. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास तक्रारदार रिक्षाचालक दिनेश अमरनाथ यादव (33) मुलुंड पूर्वेकडील आनंद टोलनाक्यावर उभे होते. त्याचदरम्यान विशालने त्याच्याकडून 2क् रुपयांची मागणी केली असता नकार देताच विशालसह त्याच्या इतर तिघा साथीदारांनी त्याला धक्काबुक्की करून जबरदस्तीने 2क् रुपये उकळले. झालेल्या घटनेदरम्यान प्रवासी रिक्षात बसलेले होते. भीतीने त्यांनी रिक्षाबाहेर पळ काढला. या प्रकरणी यादवने केलेल्या तक्रारीनुसार चौघांना खंडणीच्या गुन्ह्यात अटक करून अधिक तपास सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)
च्एकीकडे रिक्षाचालकांच्या वाढत्या मुजोरीचा फटका प्रवाशांना बसत आहे. जवळचे भाडे नाकारणो, उद्धटपणा अशा नानाविध समस्यांना प्रवाशांना तोंड द्यावे लागते. त्यात आणखीन भर म्हणून रिक्षादादांच्या दादागिरीचा नाहक त्रस प्रवाशांना सहन करावा लागतो.