शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

गणेश नाईक परिवाराच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 23:22 IST

लोकसभा निवडणुकीमध्ये नवी मुंबईमधून शिवसेनेच्या राजन विचारे यांना तब्बल ८४ हजार ८७ मतांची आघाडी मिळाली.

- नामदेव मोरेलोकसभा निवडणुकीमध्ये नवी मुंबईमधून शिवसेनेच्या राजन विचारे यांना तब्बल ८४ हजार ८७ मतांची आघाडी मिळाली. राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या ऐरोली मतदारसंघातूनही सेनेला ४४,३६३ मतांची आघाडी मिळाली. या निवडणुकीत नवी मुंबईमधील नाईकांचे बालेकिल्ले ढासळले. त्यांचा करिष्मा संपल्याचेच स्पष्ट झाले असून विधानसभा निवडणुकीमध्येही याचा फटका बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.ठाणे लोकसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादीचे माजी खासदार संजीव नाईक उमेदवारीच्या स्पर्धेमध्येही नव्हते. पक्षाने त्यांच्याऐवजी माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनी निवडणूक लढवावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती. पण नाईकांनीही निवडणुकीमधून माघार घेऊन आनंद परांजपे यांच्यावर उमेदवारी लादली. परांजपे यांना निवडून आणण्याची जबाबदारी नाईक परिवाराने घेतली होती. गणेश नाईक प्रत्येक सभेमध्ये राष्ट्रवादीचाच उमेदवार जिंकणार व नवी मुंबईमधून मोठे मताधिक्य देण्याच्या घोषणा करत होते. परंतु मागील पाच वर्षांमध्ये मतदारांशी संपर्क कमी झाल्यामुळे त्यांचा करिष्मा चाललाच नाही. त्यांच्या बेलापूर मतदार संघामधूनही शिवसेनेला तब्बल ३९,७२४ मतांची आघाडी मिळाली. राष्ट्रवादीला सर्वाधिक अपेक्षा ऐरोली मतदारसंघामधून होती. लोकसभा क्षेत्रामधील सहापैकी या एकाच मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे आमदार आहेत. विद्यमान आमदार संदीप नाईक दोन वेळा येथून विजयी झाले आहेत. परंतु त्यांना लोकसभा निवडणुकीमध्ये फारसा प्रभाव पाडता आलेला नाही.नवी मुंबई महापालिकेवर नाईक परिवाराची २५ वर्षे सत्ता आहे. यापूर्वी दोन आमदार व एक खासदार, महापौर, पालकमंत्री ही सर्व पदे त्यांच्याच घरामध्ये होती. परंतु सत्ता असताना शहरामधील एफएसआयसह प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटले नसल्यामुळे त्यांना शहरवासीयांच्या नाराजीला सामोरे जावे लागले. ऐरोली मतदारसंघामध्ये दोन वेळा संधी मिळूनही आमदार संदीप नाईक यांनाही फारसा प्रभाव पाडता आलेला नाही. २०१४ मध्ये येथून राजन विचारेंना २०,४३५ मतांची आघाडी होती. २०१९ मध्ये यामध्ये दुप्पट वाढ झाली आहे. ही वाढ नाईकांची मतदारसंघावर पकड राहिली नसल्याचे स्पष्ट करणारी आहे. नाईक परिवाराचे वास्तव्य असलेल्या मतदारसंघातही त्यांना मताधिक्य मिळविता आले नाही. यापूर्वीच्या लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकीमधील निकालानंतर नाईक परिवाराने काहीच धडा घेतलेला नाही. शिवसेना व भाजपने मात्र मागील पाच वर्षांत ताकद वाढविण्यासाठी विविध उपाययोजना केल्या. माथाडी नेते नरेंद्र पाटील यांना महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले. कोळी समाजाचे नेते रमेश पाटील यांना विधानपरिषदेचे सभापतीपद दिले. विजय चौगुले यांना वडार समाज समितीचे प्रमुख केल्याचा फायदा युतीला झाला.>विधानसभेवर काय परिणाम?लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना उमेदवाराने ऐरोली विधानसभा क्षेत्रामधून तब्बल ४४,३६३ मतांची आघाडी घेतली आहे. या मतदारसंघामध्ये भाजपने रमेश पाटील यांना विधानपरिषदेचे सदस्य केले आहे. माथाडी नेते नरेंद्र पाटील यांना महामंडळ व विजय चौगुले यांना वडार समाजाच्या समितीचे अध्यक्ष केले आहे. युतीची ताकद वाढली असून विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला फटका बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.>की फॅक्टर काय ठरला?नाईक परिवाराचा जनसंपर्क कमी झाल्याचा फटका राष्ट्रवादीच्या उमेदवाराला बसला. संघटनात्मक बांधणी करण्यात व नवमतदारांशी योग्य संवाद ठेवण्यात माजी मंत्री गणेश नाईक व आमदार संदीप नाईकही अपयशी ठरल्याचा फायदा युतीच्या उमेदवाराला झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षांमध्ये ऐरोली मतदारसंघामध्ये एक विधान परिषद सदस्य, महामंडळाचे अध्यक्ष व वडार समाज समितीचे अध्यक्षपद येथील नेत्यांकडे सोपविल्यामुळे युतीची ताकद वाढली. राज्य शासनाच्या माध्यमातून ठाणे- बेलापूर रोडवर दोन उड्डाणपूल, एक भुयारी मार्ग, शिळ - महापे रोडवर एक उड्डाणपूल व इतर विकासकामे मार्गी लावल्याचा फायदाही शिवसेना उमेदवाराला झाला.

टॅग्स :Ganesh Naikगणेश नाईकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९thane-pcठाणे