१३३ रस्ते व ५९ शाळांच्या मैदान सपाटीकरणाला मंजुरी

By Admin | Updated: October 12, 2015 04:34 IST2015-10-12T04:34:02+5:302015-10-12T04:34:02+5:30

रोजगार हमीअंतर्गत पंचायत समिती स्तरावर रोजगार हमीची कामे सुरू झाली असली तरी ती समाधानकारक नसल्याचे मत मजुरांचे आहे

Approval of 133 roads and 59 school grounds | १३३ रस्ते व ५९ शाळांच्या मैदान सपाटीकरणाला मंजुरी

१३३ रस्ते व ५९ शाळांच्या मैदान सपाटीकरणाला मंजुरी

विक्रमगड : रोजगार हमीअंतर्गत पंचायत समिती स्तरावर रोजगार हमीची कामे सुरू झाली असली तरी ती समाधानकारक नसल्याचे मत मजुरांचे आहे. १०० दिवस रोजगार मिळाला पाहिजे, असे उद्दिष्ट असताना मात्र तेवढ्या प्रमाणात रोजगार मिळत नाही. तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींमधील काही ग्रामपंचायतींमधून रस्त्याचे खडीकरण व मातीकरण यांना मंजुरी असून तालुक्यात १३३ रस्ते व ५९ शाळांच्या मैदानांचे सपाटीकरण करायला सुरुवात झाली आहे. परंतु, खडीकरणाचे रस्ते होत असताना जागेवरच खडी फोडण्याचे काम मिळावे, अशी मागणी आहे. बऱ्याचशा खडीकरण रस्त्यांची खडी ही केशरवरून आणली जात असल्याने मजुरांचे आर्थिक नुकसान होत आहे व मजुरांना मजुरीही कमी मिळते. तालुक्यात प्रत्यक्ष काम भरपूर दिसते, परंतु प्रत्यक्षात मजुरांची मजुरीच तेवढ्या प्रमाणात होत नाही. त्यामुळे मजुरांना स्थलांतर करावे लागते. (वार्ताहर)

Web Title: Approval of 133 roads and 59 school grounds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.