पनवेल महानगरपालिकेत तीन उपायुक्तांच्या नियुक्त्या; आयुक्तपद अद्यापही रिक्तच
By वैभव गायकर | Updated: March 27, 2024 16:37 IST2024-03-27T16:37:19+5:302024-03-27T16:37:36+5:30
या नियुक्त्यामध्ये संतोष वारुळे,मारुती गायकवाड आणि बाळासाहेब राजळे या उपायुक्ताचा समावेश आहे.रिक्त असलेले आयुक्त पदी बुधवारी उशीरा पर्यंत कोणतीच नियुक्ती नगर विकास विभागाच्या वतीने करण्यात आली नव्हती.

पनवेल महानगरपालिकेत तीन उपायुक्तांच्या नियुक्त्या; आयुक्तपद अद्यापही रिक्तच
पनवेल:केंद्रीय निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख आणि उपायुक्त असलेले सचिन पवार आणि गणेश शेटे यांच्या बदल्या झाल्या होत्या.यांनतर रिक्त झालेल्या जागांसाठी तीन उपायुक्तांच्या नियुक्त्या दि.26 रोजी करण्यात आल्या आहेत.
या नियुक्त्यामध्ये संतोष वारुळे,मारुती गायकवाड आणि बाळासाहेब राजळे या उपायुक्ताचा समावेश आहे.रिक्त असलेले आयुक्त पदी बुधवारी उशीरा पर्यंत कोणतीच नियुक्ती नगर विकास विभागाच्या वतीने करण्यात आली नव्हती.अचानक रिक्त झालेल्या जागांवर नियुक्त्या करण्यास शासनाने तत्परता दाखविली नसल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पावसाळी कामे तसेच मार्च एंडिंग सारखी मालमत्ता वसुलीच्या कामांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अद्यापही पालिकेची 11 सहाय्यक आयुक्त पदे रिक्त आहेत.नुकतीच 377 जागांसाठी झालेल्या नोकरभरतीच्या सर्व जागा भरल्या गेले नसल्याने पालिकेचे कामकाज उघड्यावर आल्या सारखी परिस्थिती आहे.आयुक्त पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरु असल्याने आयुक्तांची नियुक्ती लांबणीवर पडल्याचे बोलले जात आहे.