शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
3
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
4
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
5
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
6
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
7
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
8
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
9
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
10
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
11
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
12
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
13
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
14
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
15
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
16
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
17
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
18
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
19
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
20
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला

मराठी तरुणांनी उद्योजक होण्याची जिद्द बाळगावी, नामदेव जाधव यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 03:42 IST

मराठी तरुणांनी व्यवसाय करण्याची जिद्द मनात बाळगली पाहिजे. भांडवल नसेल तर सुरवातीला छोटा व्यवसाय सुरू करावा.

नवी मुंबई - मराठी तरुणांनी व्यवसाय करण्याची जिद्द मनात बाळगली पाहिजे. भांडवल नसेल तर सुरवातीला छोटा व्यवसाय सुरू करावा. मेहनत घेतली तर स्टॉल्सचे रूपांतर मॉलमध्ये व टपरीचे रूपांतर फॅक्टरीमध्ये करणे सहज शक्य असल्याचे मत प्रा. नामदेव जाधव यांनी व्यक्त केले आहे.रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य राहिलेल्या प्रा. भास्करराव थोरात यांच्या ६ व्या पुण्यस्मरणार्थ कोपरखैरणे येथील शेतकरी समाज सभागृहात आयोजित कार्यक्रमात जाधव बोलत होते. ते पुढे म्हणाले की, परवानाधारक दुकाने किंवा गाळे वाटप करण्यासाठी परवानगी देताना त्यातील ८0 टक्के दुकाने किंवा गाळे हे मराठी माणसांसाठीच राखीव ठेवले पाहिजेत. गाळे कितीही किमतीला गेले तरी परप्रांतीयांना विकले गेले नाही पाहिजेत. एक मराठी माणूस स्वत: दुकान चालवेल किंवा दुसऱ्या मराठी माणसाला भाड्याने देईल अशी यंत्रणा राज्य शासन किवा महापालिकांनी राबवायला सुरुवात करावी. नोकरीपेक्षा उद्योग सुरू करण्यास तरुणांनी प्राधान्य द्यावे. उद्योगाने सुरवातीला चार-पाच मराठी तरु णांना रोजगार मिळेल व अशाच संख्येने जर पुढे गेलो तरच मुंबईत मराठी तरु णांना उभे राहता येईल.‘लोकमत’चे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व प्रभात चॅरिटेबल ट्रस्टने सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य केल्याचे सांगितले. प्रास्ताविक आयोजक डॉ.प्रशांत थोरात यांनी केले. यावेळी सेवाभावी वृत्तीने गोरगरिबांची सेवा करणाºया प्रभात चॅरिटेबल ट्रस्टला डॉ. प्रकाश शेंडगे यांनी एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. सरोजिनी नायर आणि अशोक भांगले यांच्या निधनानंतर त्यांचे अवयवदान करण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला होता. अवयवदानाविषयी जनजागृती व्हावी यासाठी या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर होते. कार्यक्रमाचा शुभारंभ माजी मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते झाला. यावेळी माजी खासदार संजीव नाईक, प्राध्यापक राजेंद्र कुंभार, ज्ञानविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड.पी.सी.पाटील, डॉ. प्रकाश शेंडगे, डॉ.नरेंद्र उपाध्याय, नगरसेवक रामदास पवळे, घनश्याम मढवी, एकनाथ पाटील, केशव म्हात्रे, दीपक पाटील, जयश्री पाटील, आत्माराम पाटील, नितीन म्हात्रे, शाहीर रूपचंद चव्हाण, डॉ. हनुमंत पाटील, डॉ. आर.एन.पाटील, अरुण खुरे, डॉ.विनायक म्हात्रे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई