एपीएमसीत खासगी वाहनांचे अनधिकृत पार्किंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 04:49 AM2018-12-21T04:49:22+5:302018-12-21T04:49:45+5:30

खासगी वाहनांवर नियंत्रण नाही : मार्केटमध्ये रिक्षा उभ्या करण्याचे प्रमाणही वाढले

APMC private vehicles unauthorized parking | एपीएमसीत खासगी वाहनांचे अनधिकृत पार्किंग

एपीएमसीत खासगी वाहनांचे अनधिकृत पार्किंग

Next

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पार्किंगची समस्या गंभीर झाली आहे. मालवाहतुकीबरोबर खासगी वाहने मोठ्या प्रमाणात उभी केली जात आहेत. १०० पेक्षा जास्त रिक्षाही उभ्या केल्या जात असून, बेकायदेशीर पार्किंगवर कारवाई करण्यात प्रशासनाला अपयश आले आहे.

बाजार समितीचे मुख्य प्रशासक सतीश सोनी यांची प्रशासनावरील पकड ढिली झाली आहे. मार्केटमधील कामकाजाला शिस्त लावण्यात अपयश येऊ लागले आहे. वरिष्ठ अधिकारी कार्यालयात बसून राहत असल्यामुळे त्यांना प्रत्यक्ष मार्केटमधील समस्या निदर्शनास येत नाहीत. अनेक दिवसांपासून पार्किंगची समस्या गंभीर झाली आहे. कांदा मार्केटमध्ये रोज ५० ते ७० रिक्षा अनधिकृतपणे उभ्या केल्या जात आहेत. रिक्षा उभ्या करण्यासाठी परवानगी दिली कोणी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. खासगी वाहनांची संख्या वाढत असून लिलावगृहामध्येही मोटारसायकल उभ्या केल्या जात आहेत. माल खाली केल्यानंतरही अवजड वाहने मार्केटमध्येच उभी करण्यात येत आहेत. फळ मार्केटमधील स्थिती सर्वात गंभीर झाली आहे. या ठिकाणी खासगी वाहने व मोटारसायकल उभ्या केल्या जाऊ नये, असे फलक लावलेल्या ठिकाणीही वाहने उभी करण्यात येत आहेत. रात्रीही २०० पेक्षा जास्त ट्रक, टेम्पो व इतर वाहने उभी करण्यात येत आहेत. भाजी मार्केटमध्येही अनधिकृत पार्किंग वाढत आहे.
मसाला व धान्य मार्केटमध्ये खासगी वाहने उभी करण्यासाठीचे योग्य नियोजन नाही. पार्किंगचे धोरणच नसल्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. सकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होऊ लागली आहे. यावर कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.

समन्वय नाही
एपीएमसीमधील पार्किंगच्या समस्येविषयी काही अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, व्यापारी-वाहतूकदार व प्रशासन यांच्यामध्ये समन्वय राहिलेला नाही. व्यापारी व वाहतूकदारांच्या दबावामुळे अवैध पार्किंगवर ठोस कारवाई करता येत नसल्याचे बोलले जात आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी सर्व घटकांशी समन्वय साधून धोरण निश्चित करण्याची आवश्यकता असल्याचे मत अधिकाºयांनी व्यक्त केले आहे.

 

Web Title: APMC private vehicles unauthorized parking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.