पनवेलमध्ये आणखी एका पोलिसाला लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 04:43 IST2020-04-28T04:43:13+5:302020-04-28T04:43:22+5:30
संबंधित ४३ वर्षीय पोलीस कर्मचारी मानखुर्द येथे कार्यरत असून नवीन पनवेल सेक्टर १३ येथे वास्तव्यास आहे.

पनवेलमध्ये आणखी एका पोलिसाला लागण
पनवेल : पनवेल महापालिका हद्दीत आणखी एका पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. संबंधित ४३ वर्षीय पोलीस कर्मचारी मानखुर्द येथे कार्यरत असून नवीन पनवेल सेक्टर १३ येथे वास्तव्यास आहे.
पनवेल ते मानखुर्द असा रोजचा बसने प्रवास करताना त्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रविवारी कामोठेमधील पोलीस दलातील कर्मचाºयाचा कोरोनाने मृत्यू झाला होता. सोमवारी पोलीस दलातील आणखी एक रुग्ण कोरोनाने बाधित झाल्याने पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. पनवेल पालिका हद्दीतील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ५६ झाली आहे.