प्रिझम सामाजिक विकास संस्थेस राज्य युवा संस्था पुरस्कार जाहीर
By Admin | Updated: March 14, 2017 02:05 IST2017-03-14T02:05:42+5:302017-03-14T02:05:42+5:30
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याकरिता संस्थेस देण्यात येणारा २०१४-१५ चा राज्य युवा संस्था पुरस्कार

प्रिझम सामाजिक विकास संस्थेस राज्य युवा संस्था पुरस्कार जाहीर
अलिबाग : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याकरिता संस्थेस देण्यात येणारा २०१४-१५ चा राज्य युवा संस्था पुरस्कार रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील प्रिझम सामाजिक विकास संस्थेस जाहीर झाला आहे. पुरस्काराचे स्वरूप एक लाख रु पये, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह असे असून, पुरस्कार वितरण सोहळा १५ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता मुंबई विद्यापीठ पदवीदान सभागृहात संपन्न होणार आहे.
प्रिझम संस्थेच्या वतीने किशोरवयीन मुलींकरिता रायगड जिल्हा परिषदेच्या सहयोगाने मोफत कराटे प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन, आदिवासी युवक-युवतींना त्यांच्याच गावात रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी याकरिता मध प्रक्रि या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन, रक्तदान शिबिरांचे नियमित आयोजन, आदिवासी महिलांकरिता मोफत आरोग्य तपासणी शिबिरे प्रिझमच्या वतीने नियमित राबविण्यात येतात. जिल्हा विधीसेवा प्राधिकरण,रायगड-अलिबाग व प्रिझम संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ग्रामस्थांना विविध कायद्यांची माहिती व्हावी याकरिता अनेक कायदेविषयक शिक्षण शिबिरांचे रायगड जिल्ह्यातील विविध गावांमध्ये आयोजन करण्यात येते. मतदान जनजागृतीकरिता पथनाट्यातून रायगड जिल्हा प्रशासन व प्रिझम संस्थेच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृती रायगड जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात करण्यात आली.
युवक-युवतींकरिता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरांचे अनेक गावांमध्ये आयोजन, नेहरू युवा केंद्र युवा कार्यक्र म एवं खेल मंत्रालय, भारत सरकार, रायगड-अलिबाग व प्रिझम संस्थेच्या वतीने जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय विविध क्र ीडा स्पर्धांचे आयोजन, बचत गटांच्या महिलांकरिता रोजगाराभिमुख प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन अशा विविध सामाजिक उपक्र मांची दखल शासनाच्या वतीने घेण्यात आली.