पनवेल कार्यालयाचा वर्धापनदिन
By Admin | Updated: October 8, 2015 00:04 IST2015-10-08T00:04:18+5:302015-10-08T00:04:18+5:30
बहुतांश जणांना आपल्या राशीत काय दडलंय, काय योग आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. थोडक्यात राशिभविष्य हा सगळ्यांचा आवडीचा विषय. त्यात शरद उपाध्ये

पनवेल कार्यालयाचा वर्धापनदिन
- प्रशांत शेडगे, पनवेल
बहुतांश जणांना आपल्या राशीत काय दडलंय, काय योग आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. थोडक्यात राशिभविष्य हा सगळ्यांचा आवडीचा विषय. त्यात शरद उपाध्ये यांचा ‘राशीचक्र’ कार्यक्रम अतिशय लोकप्रिय. हीच मेजवानी पनवेलकरांना मंगळवारी सायंकाळी लोकमतच्या वतीने देण्यात आली. निमित्त होते लोकमत पनवेल कार्यालयाच्या पहिल्या वर्धापन दिन सोहळ्याचे. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पनवेलकर दोन तास हास्य राशीत भ्रमण करून आले.
या कार्यक्र माला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून सभागृह तुडुंब भरले होते. त्यानंतर शरद उपाध्ये यांनी वेगवेगळ्या राशीचे चक्र फिरवण्यास सुरुवात केली. प्रत्येक राशीतील नवरा-बायकोचा स्वभाव कसा असतो, त्यात वेगवेगळेपण कसे असते हे उदाहरणासह सांगून उपाध्ये यांनी हास्याचे फवारे फुलवले. या व्यतिरिक्त लग्नकार्यात विविध राशीच्या स्त्री - पुरुषांच्या गमतीजमती त्यांनी सांगितल्या.
माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी ‘लोकमत’ हे राज्यातील नंबर एकचे दैनिक आहे. मला सुध्दा लोकमत वाचल्याशिवाय चैन पडत नाही. विकासकामांमध्ये मार्गदर्शकाची भूमिका लोकमत, त्यातील बातमी पार पाडत असल्याचे ठाकूर म्हणाले. बातम्यांतून विविध समस्या आणि प्रश्नांची माहिती मिळते. त्या आधाराने अनेकदा आम्ही हे प्रश्न त्वरित सोडवित असल्याचे नगराध्यक्षा चारुशीला घरत यांनी सांगितले. निवेदक प्रवीण मोहकर यांनी सूत्रसंचालन केले.