लोकमत पनवेल कार्यालयाचा वर्धापन दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 02:35 AM2017-10-06T02:35:43+5:302017-10-06T02:36:00+5:30

लोकमत पनवेल कार्यालयाचा तृतीय वर्धापन दिन प्रल्हाद वामनराव पै यांच्या उपस्थितीत शुक्रवार, ६ आॅक्टोबर रोजी साजरा होणार आहे.

Anniversary of Lokmat Panvel office | लोकमत पनवेल कार्यालयाचा वर्धापन दिन

लोकमत पनवेल कार्यालयाचा वर्धापन दिन

googlenewsNext

पनवेल : लोकमत पनवेल कार्यालयाचा तृतीय वर्धापन दिन प्रल्हाद वामनराव पै यांच्या उपस्थितीत शुक्रवार, ६ आॅक्टोबर रोजी साजरा होणार आहे. या वेळी ‘आदर्श शिक्षक पुरस्कार २०१७’ चे वितरण व लोकमत कार्यालयात सत्यनारायणाची पूजा आयोजित करण्यात आली आहे.
पनवेल येथील लोकमत कार्यालयाचा तृतीय वर्धापन दिन वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सायंकाळी साडेचार वाजता साजरा होणार आहे. शिक्षकांना मोठी उत्सुकता असणाºया ‘आदर्श शिक्षक पुरस्कार २०१७’ चे वितरण महानगरपालिका हद्दीतील शाळा, जिल्हा परिषदेच्या व खासगी संस्थेच्या शाळा अशा एकूण ११० शाळांतील शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहेत. या वेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, महापौर कविता चौतमोल, उपमहापौर चारुशीला घरत, महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, महापालिका स्थायी समिती अध्यक्ष परेश ठाकूर, बांधकाम सभापती मनोज भुजबळ, कामगार नेते महेंद्र घरत, महापालिकेचे नगरसेवक, पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी व शिक्षण संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. लोकमत मीडिया प्रा.लि.चे सहा. उपाध्यक्ष विजय शुक्ला व आर. बालाचंदर, कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. लोकमत पनवेल कार्यालयात सकाळी ९ वाजता सत्यनारायणाची पूजा आयोजित करण्यात आली असून, पनवेलकरांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन ‘लोकमत’च्यावतीने करण्यात आले आहे.

Web Title: Anniversary of Lokmat Panvel office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.