संतप्त प्रवाशांनी तासभर शटल रोखली

By Admin | Updated: May 29, 2014 01:48 IST2014-05-29T01:48:17+5:302014-05-29T01:48:17+5:30

मंगळवारी के ळवा ते वैतरणा दरम्यान अनेक वेळा चेन पुलिंग करून काही तासासाठी रेल्वे सेवा खंडीत केली

Angry passengers stopped the shuttle for an hour | संतप्त प्रवाशांनी तासभर शटल रोखली

संतप्त प्रवाशांनी तासभर शटल रोखली

पालघर : पालघरवरून विरारकडे जाणारी ५.२९ ची डहाणू-विरार शटल ही गरीब नोकरदार व छोटे व्यवसायिकांच्या ट्रेनला मागील १५-२० दिवसांपासून केळवा, सफाळे स्टेशनवर साईडिंग देवून मागच्या मेल, एक्सप्रेस या जलद गाड्याना पुढे पासिंग दिले जात असल्याने अनेकांचा रोजगार बुडत होता. यासंदर्भात तक्रारी करूनही प. रेल्वेकडून उपाययोजना आखल्या जात नसल्याने संतप्त झालेल्या शेकडो प्रवाशांनी मंगळवारी के ळवा ते वैतरणा दरम्यान अनेक वेळा चेन पुलिंग करून काही तासासाठी रेल्वे सेवा खंडीत केली. पालघर तालुक्यातील हजारो गरीब नोकरदार नोकरी निमित्ताने तर भाजीपाला मासे, दुध घेवून महिला विक्रेत्यांचा मोठा वर्ग पालघरवरून ५.२९ वा. विरारकडे जाणार्‍या शटल ट्रेनने बोरिवली, मालाड, दादर दरम्यान नेहमी जात असतो. ही शटल ट्रेन केळवा-सफाळा स्टेशनवर आल्यानंतर साईडिंगला घेत मागील जलद एक्सप्रेस मेलना पासिंग दिले जात असल्याने अनेक नोकरदार वर्गाचा रोजगार बुडून विद्यार्थ्यांनाही उशिर होत असे. हा घटनाक्रम मागील १५-२० दिवसांपासून सतत सुरू असल्याने अनेक प्रवाशांनी यासंदर्भात तक्रारी केल्याचे सांगितले. कालही पालघरहून सुटणारी ही शटल प्रथम केळवा स्टेशनवर थांबवून उशिराने धावणार्‍या सौराष्टÑ मेलला पुढे पासिंग दिले. नंतर पुन्हा शटल सफाळे दरम्यान थांबविण्यात आल्यानंतर प्रवाशी संतप्त झाले. त्यांनी केळवा ते वैतरणा दरम्यान अनेक वेळा चेन पुलिंग करून गाडी रोखून धरली. त्यामुळे पाठीमागून येणार्‍या डहाणू-पनवेल येमू, डहाणू-बोरिवली लोकल, बलसाड फास्ट पॅसेंजर, रणकपूर एक्सप्रेस, पंचगराणी या ट्रेन उशिराने धावत होत्या. त्यामुळे या गाड्या पालघर, केळवे, सफाळे स्टेशनवर नाइलाजाने थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. (वार्ताहर)

Web Title: Angry passengers stopped the shuttle for an hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.