अंगणवाडी सेविकांची दिवाळी अंधारात

By Admin | Updated: October 25, 2014 22:35 IST2014-10-25T22:35:59+5:302014-10-25T22:35:59+5:30

बालकांमध्ये शिक्षणाची गोडी अंगणवाडीतच निर्माण केली जाते. शिक्षणाचे हे बाळकडू पाजणाऱ्या जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांचीच दिवाळी अंधारात जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

Anganwadi sevikas Diwali in darkness | अंगणवाडी सेविकांची दिवाळी अंधारात

अंगणवाडी सेविकांची दिवाळी अंधारात

भंडारा : बालकांमध्ये शिक्षणाची गोडी अंगणवाडीतच निर्माण केली जाते. शिक्षणाचे हे बाळकडू पाजणाऱ्या जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांचीच दिवाळी अंधारात जाण्याची भीती निर्माण झाली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून प्रलंबित असलेले त्यांचे मानधन आजतागायत प्रशासनाने दिले नाही. अथवा कुठल्याही लोकप्रतिनिधीने त्यासाठी प्रयत्न केलेले नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांवर ही वेळ येऊन ठेपली आहे.
भंडारा जिल्ह्यात शेकडो अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहेत. त्यांच्या मेहनतीनेच जिल्ह्यातील अंगणवाड्या सुरळीत सुरू आहे. अल्प मानधनावर गेल्या अनेक वर्षांपासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कार्यरत आहे. त्यातील बहुतांश अंगणवाडी सेविका या घटस्फोटित आणि दारिद्र्यरेषेखाली मोडणाऱ्या कुटुंबातील आहे. हातावर आणणे आणि पानावर खाने अशी त्यांची परिस्थिती त्यातही प्रशासनाने गेल्या अनेक वर्षात मानधनात समाधानकारक वाढ केली नाही, असे असतानाही मानधनही सुरळीत दिले जात नाही. आॅगस्ट ते आॅक्टोबर २०१४ या तीन महिन्यांचे मानधन अद्यापही अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना मिळाले नाही. अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांची दिवाळी गोड व्हावी यासाठी कुठलेही प्रयत्न केले नाही. त्यामुळेच अग्रीम तर सोडा साधे मानधनही दिवाळी सणाच्या तोंडावर मिळालेले नाही. मानधन तत्काळ मिळाले नाही तर तीव्र स्वरूपांचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी संघटनेनी दिला आहे. मानधनाचा हा प्रश्न मार्गी लागतो का याकडे लक्ष लागले आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Anganwadi sevikas Diwali in darkness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.