नागोठणेत युतीची मोटारसायकल रॅली
By Admin | Updated: February 13, 2017 05:08 IST2017-02-13T05:08:52+5:302017-02-13T05:08:52+5:30
जिल्हा परिषद गटाचे शिवसेना-काँग्रेस युतीचे किशोर जैन, नागोठणे पं. स. गणाचे बिलाल कुरेशी आणि ऐनघर गणाचे संजय भोसले

नागोठणेत युतीची मोटारसायकल रॅली
नागोठणे : जिल्हा परिषद गटाचे शिवसेना-काँग्रेस युतीचे किशोर जैन, नागोठणे पं. स. गणाचे बिलाल कुरेशी आणि ऐनघर गणाचे संजय भोसले यांच्या प्रचारार्थ मतदारसंघात मोटारसायकल रॅली काढली. या रॅलीचा शुभारंभ येथील शिवाजी चौकात नारळ वाढवून करण्यात आला. या वेळी किशोर जैन, बिलाल कुरेशी, संजय भोसले आदी उमेदवारांसह काँग्रेसचे नेते मारु ती देवरे, संतोष लाड, सद्दाम दफेदार, जानू कोकरे, सेनेचे विलास चौलकर, सुरेश कामथे, कीर्तीकुमार कळस, बाळू रटाटे आदींसह युतीचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोटारसायकल रॅली शहरासह चिकणी, वाकण, तामसोली, हेदवली, ऐनघर, सुकेळी, कानसई, बाळसई, वांगणी, आमडोशी, वरवठणे, आंबेघर, वेलशेत, वणी, कडसुरे, मीरानगर, मुरावाडी, कोंडगाव, निडी, वाघळी, बाहेरशीव, पळस, शेतपळस आदी गावांमध्ये फिरवण्यात येऊन शेतपळसच्या आकादेवी मंदिरात या विशाल रॅलीची समाप्ती करण्यात आली. (वार्ताहर)