शीळफाटा दुर्घटनेतील चौघांना जामीन

By Admin | Updated: October 30, 2014 01:52 IST2014-10-30T01:52:11+5:302014-10-30T01:52:11+5:30

शीळफाटा इमारत दुर्घटनेतील चौघा विकासकांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. एप्रिल 2क्13 मध्ये शीळफाटा येथे एक आठ मजली इमारत बांधकाम सुरू असतानाच कोसळली होती.

All four of the victims have been arrested | शीळफाटा दुर्घटनेतील चौघांना जामीन

शीळफाटा दुर्घटनेतील चौघांना जामीन

>ठाणो : शीळफाटा इमारत दुर्घटनेतील चौघा विकासकांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. एप्रिल 2क्13 मध्ये शीळफाटा येथे एक आठ मजली इमारत बांधकाम सुरू असतानाच कोसळली होती. त्यात 7क् जणांचा मृत्यू झाला होता. अनेक रहिवासी जखमी झाले होते. पोलिसांनी याप्रकरणी पालिका उपायुक्तांपासून पत्रकारार्पयत 27 जणांना अटक केली होती. यापैकी 15 आरोपींना यापूर्वीच जामीन मिळाला आहे. 
या इमारतीच्या विकासकांपैकी जमील शेख, अब्दुल सिद्दीकी, हदिसुल्लह चौधरी आणि अब्दुल चौधरी या चौघांचा जामीन ठाणो न्यायालयाने फेटाळला होता. त्यावर, त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश  अभय ठिपसे यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान त्यांना मंगळवारी जामीन मंजूर करण्यात आला. 
नजरुल चौधरी यांच्यासह सहा जणांना जामीन झालेला नसल्यामुळे ते न्यायालयीन कोठडीत असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलिस आयुक्त नागेश लोहार यांनी ‘लोकमत’ला दिली. (प्रतिनिधी)
 

Web Title: All four of the victims have been arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.