शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर आजपासून १२ दिवस विशेष रात्रकालीन ब्लॉक
2
"...त्यावर अमित शाहांना हसू आवरलं नाही"; जागा दाखवली म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेची शिंदेवर टीका
3
एअर शोचा व्हिडीओ पाहण्यासाठी वडील युट्यूबवर शोधत होते; अचानक विंग कमांडरांच्या मृत्यूची बातमी दिसली
4
पाकिस्तानच्या तुरुंगातील खलाशांना आणा, राज्य शासनाकडे मागणी; १८ मच्छीमार तुरुंगातच!
5
Maratha Reservation: मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची आवश्यकता तरी काय? उच्च न्यायालयात युक्तिवाद 
6
४९०, ५१० किंवा ५२० रुपयांचं पेट्रोल-डिझेल टाकल्यानं फरक पडतो का? फसवणुकीपासून वाचायचं असेल तर 'या' २ गोष्टींकडे लक्ष द्या
7
IND vs SA 2nd Test : पंतही ठरला कमनशिबी! टीम इंडिया 'या' दोन बदलासह उतरली मैदानात
8
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
9
भारताविरुद्ध कारवायांसाठी पाकिस्तान बांगलादेशचा वापर करत असल्याचा आरोप; आयएसआयकडून तरुणांना प्रशिक्षण
10
Nerul: 'महाराजांवर राजकारण नको', गणेश नाईकांची अमित ठाकरेंवरील गुन्हा मागे घेण्याची मागणी
11
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
12
आजचे राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२५, अचानक धनलाभ संभवतो, नोकरीतील वातावरण अनुकूल राहील
13
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
14
Air Pollution: राजधानी दिल्ली ठरले जगातील सर्वात प्रदूषित शहर, शाळा-महाविद्यालयांतील क्रीडा उपक्रम बंद ठेवण्याचे आदेश
15
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
16
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
17
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
18
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
19
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
Daily Top 2Weekly Top 5

इंडिया वनच्या लँडिंगनंतर विमानतळाचे उद्घाटन; पंतप्रधान मोदी यांच्या स्वागताची जय्यत तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 09:28 IST

सिडको आणि अदानी विमानतळ कंपनीने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाची जय्यत तयारी चालविली  आहे.

नवी मुंबई : सिडको आणि अदानी विमानतळ कंपनीने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाची जय्यत तयारी चालविली  आहे. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी स्वत: या विमानतळाच्या कामाच्या प्रगतीचा  आढावा घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी युद्धपातळीवर राहिलेली कामे पूर्ण करण्याची तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (एनएमआयए) भव्य ‘इंडिया वन’ विमानाने येऊन नव्या विमानतळाचे ८ किंवा ९ ऑक्टोबर रोजी उद्घाटन करतील, सांगण्यात येत आहे.

बुधवारी व्हीव्हीआयपी एअर इंडियाच्या बोइंग विमानाने नवी मुंबई विमानतळावर लँडिंग चाचणी घेतली. डिसेंबरमध्ये इंडिगोने नॅरोबॉडी एअरबस ए ३२० सह चाचणी उड्डाण केल्यानंतर, एनएमआयए येथे वाइडबॉडी विमानाचे आगमन होण्याची ही पहिलीच घटना होती. हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी चालवलेले व्हीव्हीआयपी विमान बुधवारी सकाळी १०:३० वाजता उतरले आणि दुपारी २ वाजता पुन्हा दिल्लीला रवाना झाले, यादरम्यान अधिकाऱ्यांनी सर्व लँडिंग आणि टेक-ऑफ आवश्यकता पूर्ण केल्याची खात्री केली. 

अशी आहे धावपट्टीअब्जावधी डॉलर्सचे विमान भारतीय पंतप्रधान, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींसाठी बनवलेल्या दोन कस्टम-मेड व्हीव्हीआयपी बोइंग-७७७ विमानांपैकी एक आहे. नवी मुंबई विमानतळासह येथील धावपट्टीची रचना ही जगातील मोठी आणि रुंद पंखे असलेली विमाने उतरतील, अशा पद्धतीने  केलेली आहे.

दिशादर्शक फलक लागलेविमानतळ परिसरातील रस्त्यांची डागडुजी, खड्डे बुजविण्यासह विमानतळावर ये-जा करणे  सोपे व्हावे यासाठी दिशादर्शक फलक  लावण्यासह इतर तत्सम कामे करण्यात येत आहेत. अटल सेतूसह बेलापूर-उरण, पनवेल -जेएनपीएकडे जाणारे रस्ते हे सध्या या विमातळावर येण्या-जाण्यासाठीचे प्रमुख मार्ग आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Navi Mumbai Airport Inauguration After India One Landing; PM Modi Arrival Ready

Web Summary : Navi Mumbai International Airport gears up for inauguration, potentially on October 8th or 9th, with PM Modi expected to arrive via 'India One'. A VVIP Boeing aircraft successfully completed landing tests, marking a milestone. Road repairs and signage installation are underway for smooth access.
टॅग्स :AirportविमानतळNavi Mumbaiनवी मुंबई