ऐरोलीत चिकन विक्रेत्याची हत्या

By Admin | Updated: March 30, 2017 06:56 IST2017-03-30T06:56:10+5:302017-03-30T06:56:10+5:30

ऐरोतील एका चिकन शॉप मालकाची किरकोळ वादातून हत्या करण्यात आली आहे. अलिम कुरेशी (३१) असे या मयत

Airline chicken murderer murdered | ऐरोलीत चिकन विक्रेत्याची हत्या

ऐरोलीत चिकन विक्रेत्याची हत्या

नवी मुंबई : ऐरोतील एका चिकन शॉप मालकाची किरकोळ वादातून हत्या करण्यात आली आहे. अलिम कुरेशी (३१) असे या मयत इसमाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. या गुन्ह्यातील दोन आरोपींना रबाळे पोलिसांनी अटक केली आहे. घणसोली गावातील एका मटण विक्रेत्याची त्याच्या दुकानात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने निर्घृण हत्या केल्याची घटना ताजी असतानाच ही घटना घडल्याने पोलीस यंत्रणा चक्रावून गेली आहे.
ऐरोली सेक्टर १९ मधील गावदेवी मैदानाजवळ मयत अलीम कुरेशी याचे महाराष्ट्र चिकन शॉप या नावाचे दुकान आहे, तर बाजूलाच साजिद कुरेशी व सज्जाद ऊर्फ कदीर नजीर कुरेशी यांचे देखील चिकन शॉप आहे. त्यामुळे त्यांच्यात किरकोळ स्वरूपाचे व्यावसायिक वाद होत असत. मंगळवार रात्री पुन्हा वाद झाला. या वादाचे पर्यवसान अलीम कुरेशी याच्या हत्येत झाल्याचे रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी सांगितले. या गुन्ह्यातील आरोपी साजिद कुरेशी व सज्जाद ऊर्फ कदीर नजीर कुरेशी यांना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Airline chicken murderer murdered