उरण-पनवेलमध्ये वायू प्रदूषण

By Admin | Updated: March 20, 2017 02:15 IST2017-03-20T02:15:46+5:302017-03-20T02:15:46+5:30

उरण-पनवेल परिसरातील रस्त्यांच्या कडेला तसेच डोंगर कपारीत असलेल्या अनेक क्रशर आणि क्वारीतून निघणाऱ्या प्रचंड मातीच्या

Air Pollution in Uran-Panvel | उरण-पनवेलमध्ये वायू प्रदूषण

उरण-पनवेलमध्ये वायू प्रदूषण

मधुकर ठाकूर / उरण
उरण-पनवेल परिसरातील रस्त्यांच्या कडेला तसेच डोंगर कपारीत असलेल्या अनेक क्रशर आणि क्वारीतून निघणाऱ्या प्रचंड मातीच्या धुरळ्यामुळे परिसरातील हवेत मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढले आहे. २४ तास धुरळा फे क णाऱ्या या क्रशर आणि क्वाऱ्यांमुळे रस्त्यांवरून ये-जा करणाऱ्या हजारो वाटसरूंना तोंडावर कपडा बांधूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. ज्यांच्याकडून प्रदूषण नियंत्रणात आणण्याची अपेक्षा आहे तेच या प्रदूषणास हातभार लावत आहेत.
उरण-पनवेल परिसरात विविध रस्त्यांच्या कडेला आणि डोंगर कपारीत एकूण ९८ क्वाऱ्या आहेत. यामध्ये उरण परिसरातील ११ तर पनवेल तालुक्यातील खडी, ग्रीट तयार करण्याचे काम मोठ्या प्रमाणात केले जाते. क्रशरमध्ये खडी, ग्रीट तयार करताना स्प्रिनिंग अरेंजमेंट, डस्ट सेपरेशन सिस्टीम, बोल्ट क व्हर अशा काही उपाययोजना करण्याची आवश्यकता असते. तशा
सूचना, नियम, अटीही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून परवानगी देताना स्पष्टपणे दिलेल्या असतात. मात्र अशा सूचना, अटी, नियम क्रशरचालकांकडून पायदळी तुडविल्या जात आहेत.उरण-पनवेल परिसरात २४ तास धडधडणाऱ्या क्रशरमुळे दगड, मातीचा धुरळा रस्ते, आकाशातील आसमंत अगदी व्यापून टाकतो. यामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत आहे. तसेच उरण-पनवेल मार्गावर दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते. क्रशरचा मातीचा धुरळा रस्त्यावर प्रचंड प्रमाणात पसरत असल्याने वाहन चालकांना समोरचे दिसण्यास अनेक अडचणी येतात. धुरळाही वाहन चालकांच्या नाका- तोंडात जात असल्याने त्यांच्यावर गुदमरण्याचीही पाळी येते. त्यामुळे वाहन चालकांचे लक्ष विचलित होत असल्याने अपघात घडत आहेत. तसेच अनेकांना दमा, श्वसनाचे विविध आजारही जडल्याचे सांगितले जाते.
उरण-पनवेल परिसरात अनेक क्वाऱ्याही आहेत. अशा क्वाऱ्यांनाही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत परवानगी दिली जाते. दगड, मातीचे उत्खनन करण्यासाठी अशा मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंगही केले जाते. यामुळेही हवेत धुरळा उडून वायू प्रदूषण होते. उरण-पनवेलमध्ये सुरू असलेल्या व हवेत प्रचंड प्रमाणात फैलावणाऱ्या आणि विनाशकारी क्रशरवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची आहे. मात्र त्यांच्याकडून या परिस्थितीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.हवा प्रदूषित होत असल्याची अधिकाऱ्यांची कबुलीचिरनेर परिसरात काही क्रशर अनधिकृत आहेत. नव्याने नियुक्ती झाली असल्याने काही अधिकारी विभागालाच अंधारात ठेवू पाहत आहेत. अशा अनधिकृत क्रशरची पाहणी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा दावाही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ उरण विभागाचे उप प्रादेशिक अधिकारी एस.एच. पडवळ यांनी केला. काही अधिकाऱ्यांना समक्ष विचारणा केली असता, चिरनेर परिसराकडे मागील दोन वर्षांपासून फिरकलेही नसल्याची धक्कादायक कबुलीही अधिकाऱ्याने दिली. तर पनवेल प्रदूषण मंडळ विभागाच्या अखत्यारीत ४७ क्रशर आहेत.
अधिकृत असलेल्या क्रशरमधून मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण होत असल्याची बाब पनवेल विभागाचे उप प्रादेशिक अधिकारी जयवंत हजारे यांनी मान्य केली. पनवेल परिसरात अनधिकृत क्रशर आहेत की नाही याबाबत आपणाकडे माहिती उपलब्ध नसल्याची कबुलीही हजारे यांनी दिली.

Web Title: Air Pollution in Uran-Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.