तहसीलसमोर एजंटची दुकानदारी!

By Admin | Updated: October 24, 2016 02:56 IST2016-10-24T02:56:28+5:302016-10-24T02:56:28+5:30

पनवेल तहसील कार्यालयाच्या समोर एजंटांची दुकानदारी सुरूच आहे. नागरिकांना एकेका दाखल्यासाठी अव्वाच्या सव्वा रुपये सांगून अक्षरश

Agent shopkeeping in front of Tahsil! | तहसीलसमोर एजंटची दुकानदारी!

तहसीलसमोर एजंटची दुकानदारी!

पनवेल : पनवेल तहसील कार्यालयाच्या समोर एजंटांची दुकानदारी सुरूच आहे. नागरिकांना एकेका दाखल्यासाठी अव्वाच्या सव्वा रुपये सांगून अक्षरश: लुटले जात असल्याचे प्रकार समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांची लूटमार थांबवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
तहसील कार्यालयासमोरील एजंट या ना त्या कारणांनी नेहमीच चर्चेत राहिले आहेत. कधी बोगस शिक्के तर पैसे घेऊनदेखील नागरिकांची पिळवणूक करण्याच्या अनेक तक्रारी तहसील विभागाकडे आलेल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी तहसील विभागाने नागरिकांसाठी जून महिन्यात राजस्व अभियानाअंतर्गत जवळपास १० हजारांहून अधिक विविध प्रकारचे दाखले काढून देण्यात आले होते. यात जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, नॉन क्रिमिलेयर, ज्येष्ठ नागरिक दाखला, वय अधिवास दाखला, स्थानिक वास्तव्याचा दाखला आदी प्रकारचे दाखले केवळ नाममात्र दरात उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यामुळे यात नागरिकांचा फायदा झाला होता. कोणत्याही एजंटकडे न जाता नाममात्र दरात नागरिकांना दाखले मिळाले होते. मात्र पुन्हा एकदा तहसील कार्यालयाच्या समोर बसलेल्या काही एजंटाकडून लूट होत असल्याचे समोर आले आहे.
तीन दिवसांपूर्वी ‘एजंटांकडून होत आहे लूटमार’ यासंबंधीचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिध्द झाले होते. यावेळी तहसीलदार दीपक आकडे यांनी दोन दिवसांत एजंटांना येथून काढतो असे सांगितले होते. मात्र त्यांच्या आदेशाला न जुमानता पुन्हा एकदा एजंट सक्रिय झाले असल्याचे निदर्शनास येत आहे. (वार्ताहर)

Web Title: Agent shopkeeping in front of Tahsil!