निकालानंतर मिठाईचे दर वाढले
By Admin | Updated: October 20, 2014 03:49 IST2014-10-20T03:49:25+5:302014-10-20T03:49:25+5:30
विधानसभा निवडणुकीचे निकाल लागताच गुलाल आणि ढोल ताशांच्या गजरात हरवुन गेलेले राजकीय पक्षाचे कार्यकर्ते दुपारनंतर थेट स्विट आणि मिठाईच्या दुकानात पोहोचले

निकालानंतर मिठाईचे दर वाढले
अमर म्हात्रे, नायगांव
विधानसभा निवडणुकीचे निकाल लागताच गुलाल आणि ढोल ताशांच्या गजरात हरवुन गेलेले राजकीय पक्षाचे कार्यकर्ते दुपारनंतर थेट स्विट आणि मिठाईच्या दुकानात पोहोचले. विजयी उमेदवारांचे कार्यकर्ते यांची झुंबड मिठाई घेण्याकडे वळल्या होत्या. त्यामुळे शहरी भागातील ही शॉप्स ओसंडून वाहत होती. अगदी एका दिवसावर दिवाळी आल्याने मिठाई व गोड पदार्थांना सतत मागणी वाढत आहे. मात्र निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर प्रत्येक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मिठाईच्या दुकानात मिठाईची मागणी वाढली. आणि याचाच फायदा घेउुन काही व्यापाऱ्यांनी मिठाईचे दरही वाढवले.
एरव्ही १५० ते ३०० रू. पर्यंत उपलब्ध असणारी मिठाई रविवारी ४५० ते ९०० रू. पर्यंत उपलब्ध होती. पेढे, काजु कत्तरी, मावा, बरफी यांची मागणी वाढल्याचे काही व्यापाऱ्यांनी सांगितले. आधीच या पदार्थांच्या खरेदीत निवडणुक निकालाने भर टाकल्याचे चित्र वसईत होते.