शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

वडिलांपाठोपाठ आईचीही सावली हरवली; पायलट बनण्याचे स्वप्न सोडून 'तो' झाला पोलीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 17:55 IST

He Accepted Police Job instead of pilot : कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांच्या कुटुंबातील पात्र सदस्याला अनुकंपा तत्वावर पोलीस दलात घेतले जात आहे.

ठळक मुद्दे वडिलांच्या निधनानंतर पाच महिन्यातच आईचेही छत्र हरपताच एकाकी पडल्याने अनुकंपा तत्वावर मिळालेली नोकरी त्याने स्वीकारली आहे.

नवी मुंबई : भारतीय वायुसेनेत पायलट होण्याचे स्वप्न अर्धवट सोडून वडिलांच्या जागी पोलीस होण्याची वेळ पोलीसपुत्रावर आली आहे. यासाठी तीन वर्षाच्या प्रशिक्षणावर त्याने पाणी सोडले आहे. वडिलांच्या निधनानंतर पाच महिन्यातच आईचेही छत्र हरपताच एकाकी पडल्याने अनुकंपा तत्वावर मिळालेली नोकरी त्याने स्वीकारली आहे.कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांच्या कुटुंबातील पात्र सदस्याला अनुकंपा तत्वावर पोलीस दलात घेतले जात आहे. त्यानुसार नवी मुंबई आयुक्तालयातील १९ पात्र उमेदवारांनी मंगळवारी नियुक्तीपत्र स्वीकारले. त्यात तळोजा पोलिसठाण्याचे शहीद पोलीस कर्मचारी भास्कर भालेराव यांचा मुलगा ओंकार याचाही समावेश आहे. ओंकार याला भारतीय वायुसेनेत पायलट व्हायचे होते. त्यासाठी तीन वर्षाचे प्रशिक्षण घेऊन तो नियुक्तीच्या अंतिम टप्यात पोचला होता. तत्पूर्वी जून महिन्यात वडील भास्कर यांचे निधन झाले. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यातच आईचेही छत्र हरपले. यामुळे एकाकी पडलेल्या ओंकार पुढे पुढील आयुष्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. यादरम्यान नवी मुंबई पोलिसांनी त्याला वडिलांच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर पोलीस दलात भरती होण्याची संधी दिली. यावेळी पायलट होण्याचे स्वप्न असताना पोलीस बनण्याची संधी धरू कि सोडू अशी द्विधा मनस्थिती झाली होती. अखेर वडिलांच्या जागी पोलीस दलात राहून देखील आपण देशसेवा  करू शकतो असा संकल्प त्याने मनाशी केला. यादरम्यान पोलीस दलात भरती होण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी आईने शेवटच्या श्वासापर्यंत मदत केली. त्यानंतर वडिलांच्या पोलीस मित्रांनी सर्वोत्परी प्रयत्न करून आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करून अनुकंपा तत्वाची नोकरी मिळवण्यास त्याला पात्र होण्यास हातभार लावला.

असाच प्रसंग पोलीसपत्नी रुपाली दडेकर यांच्यावर ओढवला आहे. कोरोनामुळे पती अविनाश यांच्या निधनानंतर त्यांच्या पश्च्यात सासू व दोन लहान मुलांच्या संगोपनाची जबाबदारी त्यांच्यावर आली होती. कोविड योद्धा म्हणून शासनाने दिलेले अनुदान जरी मिळाले असले, तरीही भविष्यासाठी कुठेतरी नोकरी शोधण्याच्या त्या प्रयत्नात होत्या. याचदरम्यान अनुकंपा तत्वात पोलीस होण्याची आलेली संधी त्यांनी स्वीकारली.

टॅग्स :PoliceपोलिसNavi Mumbaiनवी मुंबईpilotवैमानिक