शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
3
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
4
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
5
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
6
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
7
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
8
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
9
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
10
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
11
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
12
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
13
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
14
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
15
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
16
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
17
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
18
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
19
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
20
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या

रुंदीकरणासह खोलीकरणानंतर १९ मार्गांवर जलवाहतूक होणार सुसाट

By नारायण जाधव | Updated: May 26, 2023 19:02 IST

यामुळे मेरिटाइम बोर्डास मोठा दिलासा मिळाला आहे.

नवी मुंबई : सागरमाला प्रकल्पांतर्गत बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया जलवाहतूक सुरू झालेली असताना आता मुंंबई महानगर प्रदेशातील सात महानगरांसह कोकणातील १९ मार्गांवर प्रवाशांसह रो-रो पॅक्सद्वारे मालवाहतूक सुरू करण्यात येणार आहे. मात्र, यातील बहुतांश मार्ग खडकाळ असून, अनेक ठिकाणी रेतीसह दलदल - सागरी चिखल साचला आहे. तो काढून या मार्गांच्या खाेलीकरणासह त्यांचे रुंदीकरण आणि स्वच्छतेचे काम एमएमबी अर्थात महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडून कूर्म गतीने सुरू आहे. परंतु, यासाठी दिलेल्या परवानगीची मुदत संपल्याने आता पुन्हा सीआरझेड प्राधिकरणाने एप्रिल महिन्यात झालेल्या बैठकीत पुढील तीन वर्षे अर्थात १७ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामुळे मेरिटाइम बोर्डास मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंंबई महानगर प्रदेशातील सात महानगरे एकमेकांना प्रवासी जलवाहतूक आणि मालवाहतुकीने जोडली जाणार असल्याने सध्याचा रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतुकीवरील मोठा ताण दूर होणार आहे. शिवाय प्रवासी आपल्या कार / दुचाकी रो-रो पॅक्स सेवेद्वारे इच्छितस्थळी नेऊन त्या त्या ठिकाणी भाड्याचे वाहन न घेता स्वत:च्या वाहनांनी फिरून पर्यटनाचा आनंद लुटू शकणार आहेत. यामुळे पर्यटन उद्योगाला मोठी चालना मिळणार आहे. यामुळे जलवाहतूक सुरू होणे खूप महत्त्वाचे आहे.

या खाड्या आणि नदी मार्गांची खोली वाढवून करणार रुंदीकरणअरबी समुद्रातील ठाणे खाडी, वसई खाडीसह, बाणकोट, धरमतर, नागाव, उलवा, दादर - रावे, राजपुरी, आजरा, दाभोळ, जयगड, पालशेत, कालबादेवी, मालगुंड, राजापूर, वाघोटन हे खाडी मार्ग आणि उल्हासनदी, वैतरणा नदी, तानसा नदी, काळ, कुंडलिका नदी मार्गाचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यात येणार आहे.

एवढी आहे जलवाहतूक मार्गांची लांबी

  • रायगड जिल्हा ३२४.२ किलोमीटर
  • ठाणे-पालघर - ९६.७ किलोमीटर
  • रत्नागिरी - २६.३ किलोमीटर

यात ठाणे - पालघर जिल्ह्यातील जलमार्गातून २५७०३२७ क्युबिक मीटर आणि रायगड जिल्ह्यातील मार्गातून १६३४४९७ क्युबिक खोलीकरण व रुंदीकरण करण्यात येणार आहे. प्रवासी वाहतुकीसाठी सुचविलेले नऊ मार्ग भाईंदर ते घोडबंंदरडोंबिवली ते भाईंदरडोंबिवली ते काल्हेरकाल्हेर ते भाईंदरकोलशेत ते भाईंदरनारंंगी ते खरवडेश्वरीबेलापूर ते गेट वे ऑफ इंडियारेडिओ क्लब ते बेलापूर / मांडवा / मोरा-उरण रो-रो पॅक्स मालवाहतुकीसाठी सुचविलेले मार्गभाईंदर ते वसईमार्वे ते मनोरीरेवस ते करंजानारंंगी ते खरवडेश्वरीवसई ते घोडबंदरबोरिवली ते गोराईवेलदूर ते दाभोळडीसीटी ते काशीदतोराडी ते आंबवणेडीसीटी ते नेरूळ ही महानगरे जवळ येऊन इंधनात बचत होणारमुंंबई - नवी मुंंबईसह कल्याण - डोंबिवली, ठाणे, भिवंडी, मीरा - भाईंदर - वसई आणि नजीकचे उरण, अलिबाग व कोकणातील दाभोळ, वेलदूर, आंबवणेसारख्या बंंदरांवरही चाकरमान्यांना कॅटमरान, स्पीड बोटींसह रो-रो पॅक्सने ये-जा करता येणार आहे. सध्या भाऊचा धक्का ते रेवस, करंजा, मोरा, धरमतर मार्गावर प्रवासी जलवाहतूक सुरू आहे. यामुळे प्रवासाचे अंतर जवळ येऊन इंधनासह वेळेचीही बचत होऊन प्रदूषण आणि अपघातांचे प्रमाण कमी होणार आहे.

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई