शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

अफगाणी लसूण मस्त; ‘देशी’पेक्षा भाव जास्त; किरकोळ मार्केटमध्ये ३८० रुपये दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 09:04 IST

देशात लसणाची आतापर्यंतची ही सर्वांत मोठी टंचाई आहे. चालू हंगामामधील साठा संपत चालला असून, बाजारभावाचा विक्रम झाला आहे.

- नामदेव मोरेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : राज्यातील सर्वच शहरांमध्ये लसणाच्या दरामध्ये प्रचंड वाढ होत आहे. मुंबई बाजार समितीमध्ये सध्या १२० ते २३० रुपयाने लसणाची विक्री होत आहे. पुणे बाजार समितीमध्ये सोमवारी सर्वाधिक १०० ते २७० रुपये किलो भाव मिळाला. मुंबईतील किरकोळ मार्केटमध्ये ३०० ते ३८० रुपये दराने विक्री होत आहे. अफगाणीस्तानच्या लसणाची आवकही होऊ लागली असली तरी त्याचे दर मात्र देशी लसणापेक्षा जास्त आहेत. 

देशात लसणाची आतापर्यंतची ही सर्वांत मोठी टंचाई आहे. चालू हंगामामधील साठा संपत चालला असून, बाजारभावाचा विक्रम झाला आहे. मुंबई बाजार समितीमध्ये सोमवारी २२६ टन लसणाची आवक झाली. मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थानमधून मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. देशी लसणाचे दर १२० ते १८० रुपये किलोंवर पोहोचले आहेत. अफगाणीस्तानमधून आयात झालेल्या लसूणचे दर २०० ते २३० रुपये आहेत. यामुळे भाव कमी करण्यासाठी त्याचा काहीही उपयोग होत नाही. नवी मुंबईत किरकोळ मार्केटमध्ये लसूण सरासरी ३०० ते ३८० रुपये किलो दराने विकला जात आहे. काही ठिकाणी चांगल्या दर्जाच्या लसणाची किंमत यापेक्षाही जास्त आहे.

कांद्याची घसरण सुरूच शासनाच्या निर्यातीबंदीच्या निर्णयामुळे कांद्याची घसरण सुरू झाली आहे. मुंबई बाजार समितीमध्ये गत आठवड्यात कांदा २५ ते ४५ रुपये किलो दराने विकला जात होता. सोमवारी १२०० टन आवक झाली असून, कांद्याचे दर १३ ते २९ रुपये एवढे कमी झाले आहेत. बाजार समिती संचालक अशोक वाळुंज यांनी सांगितले की, निर्यातबंदीमुळे दर कमी झाले असून, नवीन कांद्याची आवक सुरू झाल्यामुळेही दरात घसरण झाली आहे.

राज्यातील लसणाचे प्रतिकिलो बाजारभाव बाजार समिती    बाजारभाव मुंबई    १२० ते २३०पुणे    १०० ते २७०सोलापूर    ११५ ते २२०अकलूज    १५० ते २००हिंगणा    २२० ते २५०नाशिक    ७५ ते २०१सांगली    १२५ ते २२६नागपूर    १६० ते २४०