शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
5
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
6
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
7
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
8
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
9
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
10
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
11
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
12
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
13
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
14
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
15
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
16
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
17
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
18
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
19
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
20
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासकीय भवनाचे काम रखडलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 02:20 IST

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर पनवेलचे नागरीकरण झपाट्याने होत आहे. त्या तुलनेत या भागात शासकीय आरोग्य सुविधेचा अभाव दिसून येत आहे.

- वैभव गायकर पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर पनवेलचे नागरीकरण झपाट्याने होत आहे. त्या तुलनेत या भागात शासकीय आरोग्य सुविधेचा अभाव दिसून येत आहे. महामार्गावर दररोज लहान-मोठे अपघात होतात. यात जखमी व्यक्तींना खासगी रुग्णालयात घेऊन जावे लागते. किंवा थेट मुंबईला न्यावे लागते. त्यात वेळ आणि पैसा खर्च होतो, शिवाय रुग्णांना अनेक गैरसोयीला सामोरे जावे लागते.पनवेलसह सिडको वसाहतीत अनेक खासगी रुग्णालये आहेत; परंतु येथील उपचार सर्वसामान्य रुग्णांच्या खिशाला परवडणारे नाहीत. पनवेल उपजिल्हा रुग्णालय हा चांगला पर्याय मानला जातो; परंतु याकरिता तयार करण्यात येत असलेल्या इमारतीचे काम गेल्या पाच वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. शहरातील प्रशासकीय भवनाचे काम रखडल्याने, ‘सरकारी काम सात वर्षे थांब’ अशी परिस्थिती पनवेल शहरात निर्माण झाली आहे.उपजिल्हा रुग्णालयाप्रमाणेच तहसीलदार कार्यालय, पनवेल शहर पोलीसठाणे आणि कोषागार विभाग यांना एका छताखाली आणणाºया पनवेल प्रशासकीय भवनाचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. मात्र, निधीअभावी प्रशासकीय भवनाचे कामही रखडल्याचे पाहावयास मिळाले आहे. तीन माळ्यांच्या प्रशासकीय भवनात तळमजल्यावर पनवेल शहर पोलीसठाणे असणार आहे. दुसºया माळ्यावर तहसील कार्यालय आणि संबंधित सर्व कार्यालये असतील, तर तिसºया मजल्यावर कोषागार विभागाची स्ट्राँग रूम असेल. प्रशासकीय इमारतीची नुकतीच पनवेल शहर पोलीसठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी पाहणी केली. या पाहणीत तळमजल्यावर बांधण्यात आलेली पोलीस कोठडी आणि विश्रामगृह हे चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आल्याचे लक्षात आले. तसेच तालुक्याची म्हणजेच कोषागार विभागाची स्ट्राँग रूम पोलीस कोठडीजवळ असण्याची सूचना चव्हाण यांनी केली आहे. मात्र, प्रशासकीय भवनाच्या उभारणीत अद्याप कोट्यवधींच्या निधीची कमतरता असल्याने या निधीची प्रतीक्षा लागून राहिली आहे.शहरातील उपजिल्हा रुग्णालय आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाठपुरावा केल्यानंतर १० फेब्रुवारी २००९ साली ३० खाटांच्या इमारतीला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. यासाठी पर्यटन विकास महामंडळाचे माजी संचालक आणि स्थानिक शिवसेनानेते चंद्रशेखर सोमण यांनी रुग्णालय होण्यासाठी जोर लावला होता. त्याकरिता तीन कोटी रुपये खर्चालाही शासनाने मान्यता दिली. ३० आॅक्टोबर २०१०ला दोन कोटी रकमेस तांत्रिक मान्यता प्रदान करण्यात आली. २०११ साली तत्कालीन आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांच्या हस्ते या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. त्या वेळी स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार प्रशांत ठाकूर यांनी या ठिकाणी १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय बांधण्याची मागणी केली. त्यानुसार २ फेब्रुवारी २०११ रोजी ट्रॉमा केअर युनिट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर ३० खाटांची क्षमता असलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यास मंजुरी मिळाली. त्यानंतर शासनाच्या मुख्य वास्तुशास्त्रज्ञाने नवीन वास्तुशास्त्रीय आराखडे तयार केले. त्यानुसार या कामाचे अंदाजपत्रक १६ कोटी ९१ लाख ९६ हजारांवर गेले. मूळ तीन कोटींचा आराखडा वजा करून अतिरिक्त १३ कोटी ८३ लाख ९८ हजार रकमेच्या अंदाजपत्रकाला आरोग्य विभागाकडून मान्यता मिळाली. त्यानुसार सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आणि ठेकादारीचीही नियुक्ती करण्यात आली. संबंधित भूखंडावर सुरुवातीला मंजूर करण्यात आलेल्या नकाशानुसार बांधकाम कधीच पूर्ण झाले आहे. तळमजल्यासह दोन मजली इमारत बांधण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक मजला २२५६.०२ चौरस मीटर असे एकूण ६७६८.०६ इतके क्षेत्रफळाचे बांधकाम करण्यात येत आहे. या व्यतिरिक्त अंतर्गत गटारे, जमिनीखाली पाण्याची टाकी, विद्युतीकरण, बाह्य पाणीपुरवठा, पथदिवे, उद्यवाहन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, बगिचा आदी बाबींचा त्यामध्ये समावेश आहे.>गरीब, गरजूंची उपेक्षापनवेलमधील गरीब आणि गरजू रुग्णांकरिता अद्ययावत सोयी-सुविधांयुक्त उपजिल्हा रुग्णालय सुरू होणे गरजेचे आहे. पनवेलसह उपनगरांत अनेक खासगी रुग्णालये आहेत. सर्वसामान्यांना ती रुग्णालये परवडणेजोगे नाहीत. उपजिल्हा रु ग्णालय जोपर्यंत सुरू होत नाही, तोपर्यंत रुग्णांना खासगी रुग्णालयाचा आसरा घ्यावा लागत आहे, तर पैशांच्या अडचणीमुळे गोरगरीब रुग्णांना मात्र उपचार घेणे मुश्कील झाले आहे.>प्रशासकीय भवनाचे काम निधीअभावी रखडले आहे. सा. बा. विभागामार्फत आम्ही महसूल मंत्रालयाकडे साडेतीन कोटींच्या मागणीचा प्रस्ताव पाठविला आहे. हा निधी मंजूर झाल्यानंतर प्रशासकीय भवनाच्या कामाला सुरु वात होईल, तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे काम सद्यस्थितीला सुरू आहे.- एस. एम. कांबळे,सहायक अभियंता, सा. बा. पनवेल