कार्यकत्र्याला मारहाण o्रमजीवीचा मोर्चा

By Admin | Updated: December 8, 2014 23:41 IST2014-12-08T23:41:40+5:302014-12-08T23:41:40+5:30

कायद्याच्या रक्षकांकडून पुरोगामी महाराष्ट्र राज्यात सामाजिक कार्यकत्र्याना अशी मारहाण होणो ही अत्यंत निषेधार्ह बाब असल्याचे तालुका अध्यक्ष लहांगे यांनी यावेळी भाषणात सांगितले.

Activist Strikes | कार्यकत्र्याला मारहाण o्रमजीवीचा मोर्चा

कार्यकत्र्याला मारहाण o्रमजीवीचा मोर्चा

डहाणू : वसई येथील o्रमजीवी संघटनेचे तरूण आदिवासी कार्यकर्ते गणोश यशवंत उंबरसाडा यांना वसई पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवा पाटील यांनी भर पोलीस ठाण्यात अमानुषरित्या बेदम मारहाण केल्याच्या निषेधार्थ o्रमजीवी संघटनेचे डहाणू तालुका अध्यक्ष सुभाष लहांगे यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी डहाणू येथे शेकडो कार्यकत्र्यानी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून पोलीसांचा निषेध केला.
आज सकाळी डहाणू तहसिलदार कार्यालयावर काढलेल्या मोर्चात शेकडो आदिवासी स्त्री, पुरूष तालुका अध्यक्ष सुभाष लहांगे, महिला प्रमुख अनिता धांगडा, सचिव अशोक भोईर, विजय जाधव इ. पदाधिकारी उपस्थित हेाते. यावेळी जनतेचे संरक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या कायद्याच्या रक्षकांकडून पुरोगामी महाराष्ट्र राज्यात सामाजिक कार्यकत्र्याना अशी मारहाण होणो ही अत्यंत निषेधार्ह बाब असल्याचे तालुका अध्यक्ष लहांगे यांनी यावेळी भाषणात सांगितले.
डहाणू पारनाक्यापासून सुरू झालेल्या मोर्चा डहाणू तहसिलदार कार्यालयावर पोहोचताच तेथे त्याचे सभेत रुपांतर झाले. त्यानंतर मोर्चातील शिष्टमंडळाने तहसिलदार प्रितीलता कौरंथी माने यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. निवेदनात o्रमजीवीचे कायकर्ते गणोश उंबरसाडा याना मारहाण करणा:या पोलीस अधिका:यांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. ती मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

 

Web Title: Activist Strikes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.