थर्टीफस्टच्या रात्री नवी मुंबईत २३६ मद्यपी चालकांवर कारवाई
By नामदेव मोरे | Updated: January 1, 2024 13:21 IST2024-01-01T13:21:53+5:302024-01-01T13:21:59+5:30
नवीन वर्षाचे स्वागत शांततेत व आनंदात साजरे व्हावे यासाठी शहरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता

थर्टीफस्टच्या रात्री नवी मुंबईत २३६ मद्यपी चालकांवर कारवाई
नवी मुंबई: ३१ डिसेंबर च्या रात्री पनवेल, नवी मुंबई, उरण परिसरात पोलिसांनी मद्यपी चालकाविरोधात मोहीम राबविली होती. रात्रभर २३६ चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
नवीन वर्षाचे स्वागत शांततेत व आनंदात साजरे व्हावे यासाठी शहरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. १६ वाहतूक पोलीस चौकीच्या कार्यक्षेत्रातील सर्व महत्वाच्या रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली होती. वाहतूक पोलिसांनी मद्यपान करून वाहन चालविणा-यांवरही कारवाई केली. ब्रेथॲनलायझर मशीन च्या सहाय्याने चालकांची तपासणी करण्यात येत होती. पहाटेपर्यंत २३६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. सायन पनवेल महामार्ग, पामबीच रोड, ठाणे बेलापूर रोड, जेएनपीटीसह सर्व प्रमुख मार्गांवर ही कारवाई करण्यात आली. पोलिस आयुक्त मिलींद भारंबे, वाहतूक पोलीस उपायुक्त तिरूपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.