शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

ऐरोलीत अनधिकृत बांधकामांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 05:05 IST

सिडकोची धडक मोहीम : ४०० चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड केला अतिक्रमणमुक्त

नवी मुंबई : अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांवर सिडकोने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. बुधवारी ऐरोली विभागातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून सुमारे ४०० चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड अतिक्रमणमुक्त करण्यात आला. विशेष म्हणजे, या कारवाईला बांधकामधारकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी हा विरोध हाणून पाडल्याने सिडकोच्या अतिक्रमण विरोधी पथकाने ही मोहीम पूर्ण केली.

शहरात आजही मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी बेकायदा बांधकामे आणि अतिक्रमणांवर धडक कारवाई करण्याचे निर्देश संबंधित विभाग कार्यालयाला दिले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या विभाग कार्यालयाकडून अधूनमधून कारवाई केली जाते; परंतु ही मोहीम म्हणावी तशी प्रभावी नसल्याने बांधकामधारक मोकाट सुटले आहेत, त्या तुलनेत सिडकोने मात्र आपल्या भूखंडावरील अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा धडाका लावला आहे. सिडकोच्या अनधिकृत बांधकाम विभागाचे मुख्य नियंत्रक एस. एस. पाटील यांच्या निर्देशानुसार नवी मुंबईसह पनवेल व उरण तालुक्यातील सिडको कार्यक्षेत्रात मोहीम राबविली जात आहे.

बुधवारी अतिक्रमण विभागाचे नियंत्रक पी. बी. राजपूत आणि सहायक नियंत्रक गणेश झिने यांच्या उपस्थितीत कडेकोट पोलीस बंदोबस्तात ऐरोली सेक्टर ९ मधील एक मजल्याच्या अनधिकृत इमारतीवर हातोडा मारण्यात आला. विशेष म्हणजे, या बांधकामाला एमआरटीपी अ‍ॅक्टनुसार नोटीसही बजावण्यात आली होती; परंतु संबंधिताने काम सुरूच ठेवल्याने अखेर त्यावर कारवाई करण्यात आली. सेक्टर ९ येथील दिवा-ऐरोली विभागात २५० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेवर उभारण्यात आलेले जोथ्यापर्यंतचे पक्के बांधकामही जमीनदोस्त करण्यात आले. या कारवाईच्या वेळी १०० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तर २० मजूर, दोन पॉकलेन आणि एक जेसीबी आदी यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला. दरम्यान, येत्या काळात अतिक्रमण विरोधी मोहीम अधिक तीव्र केली जाणार असल्याने नागरिकांनी बेकायदा बांधकामे करू नयेत, असे आवाहन सिडकोच्या वतीने करण्यात आले आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMuncipal Corporationनगर पालिका