कोपरखैरणेत मंदिरावर कारवाई

By Admin | Updated: October 15, 2016 06:58 IST2016-10-15T06:58:24+5:302016-10-15T06:58:24+5:30

महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शुक्रवारी पहाटे कोपरखैरणेमधील विनापरवाना मंदिरावर कारवाई केली. प्रस्तावित अग्निशमन दलाच्या

Action on the temple at Koparkhakharan | कोपरखैरणेत मंदिरावर कारवाई

कोपरखैरणेत मंदिरावर कारवाई

नवी मुंबई : महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शुक्रवारी पहाटे कोपरखैरणेमधील विनापरवाना मंदिरावर कारवाई केली. प्रस्तावित अग्निशमन दलाच्या केंद्रालगतच हे मंदिर बांधण्यात आले होते. परंतु संबंधितांना नोटीस बजावूनही बांधकाम न हटवल्यामुळे पालिकेने पोलीस बंदोबस्तात कारवाई केली.
कोपरखैरणे सेक्टर १ येथील अग्निशमन केंद्राच्या भूखंडालगतच हे मंदिर बांधण्यात आलेले होते. हा भूखंड खाजगी मालकीचा असल्याचा दावा संबंधितांनी केलेला आहे. परंतु सदर भूखंड सिडकोकडून पालिकेला हस्तांतर झालेला आहे. त्यानुसार भूखंडाच्या एका भागात अग्निशमन केंद्राचे काम सुरु करण्यात आले आहे. त्यामध्ये अनधिकृत बांधकामाचा अडथळा होवू नये याकरिता विनापरवाना मंदिर हटवणे गरजेचे होते. यानुसार पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने मंदिर बांधणाऱ्या संबंधितांना नोटीस बजावली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Action on the temple at Koparkhakharan