तळीरामांवर कारवाई

By Admin | Updated: June 2, 2016 01:40 IST2016-06-02T01:40:21+5:302016-06-02T01:40:21+5:30

बीअरशॉपीबाहेर उघड्यावर मद्यपान करणाऱ्या सात जणांवर कोपरखैरणे पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यामुळे घणसोली रेल्वे स्थानकासमोरील पदपथ पादचाऱ्यांच्या वापरासाठी मोकळे झाले आहेत.

Action on Pond | तळीरामांवर कारवाई

तळीरामांवर कारवाई

नवी मुंबई : बीअरशॉपीबाहेर उघड्यावर मद्यपान करणाऱ्या सात जणांवर कोपरखैरणे पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यामुळे घणसोली रेल्वे स्थानकासमोरील पदपथ पादचाऱ्यांच्या वापरासाठी मोकळे झाले आहेत.
शहरातील बीअरशॉपीबाहेरच उघड्यावर केल्या जाणाऱ्या मद्यपानाचा सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यापैकी सीबीडी व घणसोली येथील काही ठिकाणी तळीरामांचे अड्डे झाले होते. बारमध्ये बसून पिण्याचा खर्च वाचवण्यासाठी बीअरशॉपीबाहेरच त्यांच्याकडून मद्यपान केले जायचे. याकरिता बीअरशॉपीचालकांकडूनही त्यांना अपेक्षित सहकार्य लाभत होते. मात्र या प्रकारामुळे सार्वजनिक वापराची जागा अथवा पदपथ तळीरामांकडून व्यापले गेल्यामुळे पादचाऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागत होते. त्यानुसार रविवारी सीबीडी पोलिसांनी उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांवर कारवाई केली होती. तर मंगळवारी कोपरखैरणे पोलिसांनी सात जणांवर कारवाई केली आहे. घणसोली रेल्वे स्थानकासमोरील मिना बीअरशॉपीच्या बाहेरच उघड्यावर मद्यपान केले जायचे. या प्रकाराची रहिवाशांनी अनेकदा तक्रार देखील केलेली आहे. त्यानुसार काही महिन्यांपूर्वीच कोपरखैरणे पोलिसांनी त्या ठिकाणी कारवाई केलेली. त्यानंतरही उघड्यावर मद्यपान होत असल्यामुळे मंगळवारी रात्री पुन्हा पोलिसांनी कारवाई केली. यावेळी सात तळीरामांवर कारवाई केल्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे यांनी सांगितले. तर यापुढेही त्या ठिकाणी उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचाही इशारा त्यांनी दिला आहे.
शहरात अद्यापही अनेक ठिकाणी बीअरशॉपीबाहेर करण्याचे प्रकार सुरूच आहेत. हे प्रकार टाळण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने बीअरशॉपीचालकांविरोधात कारवाईची मोहीम राबवणे आवश्यक आहे. परंतु तसे होत नसल्यामुळे तळीरामांचे फावले जात आहे. सायन-पनवेल मार्गावर वाशीगाव येथे असलेल्या बीअरशॉपीबाहेर देखील रात्री उशिरापर्यंत असाच प्रकार सुरू असतो. मुख्य मार्गालगतचे हे ठिकाण असल्यामुळे मुंबईकडे जाणारे अनेक जण त्या ठिकाणी उघड्यावर मद्यपान करतात. यामुळे रात्री उशिरापर्यंत हे बीअरशॉप खुले ठेवले जात असल्यामुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याच्या स्थानिकांच्या तक्रारी आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Action on Pond

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.