आॅनलाइन क्रिकेट बेटिंगवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2015 00:37 IST2015-12-29T00:37:27+5:302015-12-29T00:37:27+5:30

क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या दोघांवर गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाने कारवाई केली आहे. त्यांच्याकडून क्रिकेटच्या विविध सामन्यांवर आॅनलाइन सट्टा लावला जात होता.

Action on the online cricket betting | आॅनलाइन क्रिकेट बेटिंगवर कारवाई

आॅनलाइन क्रिकेट बेटिंगवर कारवाई

नवी मुंबई : क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या दोघांवर गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाने कारवाई केली आहे. त्यांच्याकडून क्रिकेटच्या विविध सामन्यांवर आॅनलाइन सट्टा लावला जात होता. याची माहिती मिळताच अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
आॅस्ट्रेलिया बिग बेस क्रिकेट सामन्यावर आॅनलाइन बेटिंग सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. यानुसार उपायुक्त दिलीप सावंत, साहाय्यक आयुक्त राजेंद्र भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगदिश कुलकर्णी, साहाय्यक निरीक्षक कृष्णा कोकणी, सुभाष शिंदे, हवालदार संजय पवार, किरण राऊत यांच्या पथकाने त्यावर कारवाई केली आहे. पनवेलमधील कोळखे गावातील प्रतिमा स्मृती या इमारतीमध्ये हा बेटिंगचा अड्डा सुरू होता. विविध क्रिकेट सामन्यांवर त्यांच्याकडून आॅनलाइन बेटिंग लावली जात होती. याप्रकरणी प्रदीप महेश्वरी (३९) व प्रवीण पाटील (२७) यांना अटक केल्याचे उपायुक्त दिलीप सावंत यांनी सांगितले. तर घटनास्थळावरून १ लॅपटॉप, १ टीव्ही, ९ मोबाइल व ३ रजिस्टर व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्या ठिकाणी एक महिन्यापासून बेटिंगचा अड्डा चालवत असल्याचे चौकशीत समोर आले आहे.

Web Title: Action on the online cricket betting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.