खारघरमधील वीटभट्ट्यांवर कारवाई
By Admin | Updated: March 12, 2017 02:18 IST2017-03-12T02:18:01+5:302017-03-12T02:18:01+5:30
खारघरमधील विविध सेक्टर सुरू असलेल्या स्थानिकांच्या वीटभट्ट्यांवर पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी शनिवार कारवाई केली. सुरू असलेल्या

खारघरमधील वीटभट्ट्यांवर कारवाई
पनवेल : खारघरमधील विविध सेक्टर सुरू असलेल्या स्थानिकांच्या वीटभट्ट्यांवर पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी शनिवार कारवाई केली. सुरू असलेल्या वीटभट्टीवर पाण्याची फवारणी करून जेसीबीच्या साहाय्याने या वीटभट्ट्या तोडण्यात आल्या. या वेळी पनवेल महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह, खारघर पोलीस ठाणे, खारघर अग्निशमन दलाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खारघर सेक्टर ३०, ३५, १०, ८ आदी ठिकाणच्या उच्चभ्रू वस्ती शेजारी या वीटभट्ट्या असल्याने प्रदूषण होत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली होती. आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी तक्रारीची गंभीर दखल घेत, या ठिकाणच्या वीटभट्ट्यांवर कारवाई केली. कारवाईपूर्वी वीटभट्टी मालकांना महापालिकेच्या वतीने कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, तरीही या वीटभट्ट्या सुरूच राहिल्याने अखेर आयुक्तांनी कारवाईचा बडगा उचलला. खारघरमधील ११ वीटभट्ट्यांवर कारवाई करण्यात आली. कारवाई करण्यात आलेल्या वीटभट्टी मालकांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यतादेखील वर्तविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
कारवाई झालेल्या वीटभट्टी मालकांची नावे
महेंद्र कृष्णा घरत, मंगेश घरत, केशव शेळके, जिनेश वास्कर, उत्तम कोळी, बबन तोडेकर, गणपत ठाकूर, समाधान धरणेकर, रमेश शनिवार पवार.
वीटभट्ट्यांमधून होणाऱ्या प्रदूषणाबाबत स्थानिकांकडून तक्रार करण्यात आली होती. प्रदूषणामुळे कर्करोग, फुप्फुसाचे आजार बळावण्याचा धोका लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे.
- डॉ. सुधाकर शिंदे, आयुक्त, पनवेल