Accused arrested by Panvel police | पनवेल पोलिसांकडून ६३ मोबाइलसह आरोपी जेरबंद

पनवेल पोलिसांकडून ६३ मोबाइलसह आरोपी जेरबंद

पनवेल : शहर पोलिसांनी मोबाइलचोरांना अटक करून त्यांच्याकडून ११ लाख १० हजार रुपये किमतीचे ६३ मोबाइल हस्तगत केले आहेत. पनवेल येथून एक व झारखंड येथून एक, अशा दोघांना अटक करण्यात आली आहे.
आॅक्टोबर महिन्यात पनवेल येथे मोबाइल चोरत असताना आरोपी कुंदनकुमार महतो (वय २१ वर्षे, झारखंड) यास अटक केली होती. त्याच्याकडे पोलिसांना आणखी काही चोरीचे मोबाइल सापडून आले. शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी अधिक चौकशी केली असता चोरलेले मोठ्या कंपनीचे मोबाइल सूरत येथे ठेवले असल्याची माहिती पुढे आली. पोलिसांनी आरोपी महतो याला घेऊन सूरत गाठले व तेथून लाखो रुपये किमतीचे मोबाइल हस्तगत केले. मोबाइलचोरीच्या गुन्ह्यात आणखी साथीदार असल्याची माहिती महतो याने पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी दुसऱ्या आरोपीला पकडण्यासाठी झारखंड गाठले. या वेळी पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तेथून आझम जेक्कू शेखला अटक केली.
कुंदनकुमार हा रेकॉर्डवरील आरोपी असून, त्याचा साथीदार आझम जेक्कू शेख, यास झारखंड येथून अटक करण्यात आली आहे. चोरी केलेले मोबाइल हे आरोपी नेपाळ, बांगलादेश या ठिकाणी विक्रीसाठी पाठवत असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

Web Title: Accused arrested by Panvel police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.