खुनातील आरोपींना 9 महिन्यांनी अटक
By Admin | Updated: September 30, 2014 01:31 IST2014-09-30T01:31:00+5:302014-09-30T01:31:00+5:30
शहरातील खेमाणी परिसरात राहणा:या वृद्ध महिलेच्या हत्या प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागाने 9 महिन्यांनंतर दोन आरोपींना अटक केली आहे.

खुनातील आरोपींना 9 महिन्यांनी अटक
>उल्हासनगर : शहरातील खेमाणी परिसरात राहणा:या वृद्ध महिलेच्या हत्या प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागाने 9 महिन्यांनंतर दोन आरोपींना अटक केली आहे. व्यसनातून खून केल्याचे उघड झाल्याची माहिती पोलिसांनी दिली़
शहरातील खेमाणी करण पॅलेसमध्ये राहणा:या मीना रमेशलाल लासी, वय 58 या वृद्धेची 1क् जानेवारी 2क्14 रोजी निर्घृण हत्या झाले होते. चोरटय़ांनी चोरीच्या उद्देशाने त्यांचा खून करून घरातील दागिने व 7 लाख लंपास केल्याचे उघड झाले होते. चोरी प्रकरणात नरेश सितलानी याला अटक करून चौकशी केली असता त्याने रवी तलरेजा हाही सहभागी असल्याची कबुली दिली होती. रवीची चौकशी केली असता त्याने मित्र विकी गाजापूरच्या मदतीने मीना लासी यांचा खून केल्याची कबुली गुन्हे अन्वेषण विभागाला दिली.