31st December : 'द अ‍ॅक्सिडेंटल शो', 31 डिसेंबरची पार्टी करणाऱ्यांसाठी देखाव्यातून जागृती संदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 11:27 AM2019-12-31T11:27:10+5:302019-12-31T11:36:46+5:30

31st December : 31 डिसेंबरच्या सेलेब्रेशनच्या निमित्ताने मद्यपान केल्याने अनेक अपघात घडत असतात.

'The Accidental Scene', a December 31 awareness message for partygoers in panvel | 31st December : 'द अ‍ॅक्सिडेंटल शो', 31 डिसेंबरची पार्टी करणाऱ्यांसाठी देखाव्यातून जागृती संदेश

31st December : 'द अ‍ॅक्सिडेंटल शो', 31 डिसेंबरची पार्टी करणाऱ्यांसाठी देखाव्यातून जागृती संदेश

Next

वैभव गायकर

पनवेल -  नववर्षाचे स्वागत आणि 31 डिसेंबरची रात्र म्हटलं की, पार्ट्यांचा बेत, फुल्ल ऑन सेलिब्रेशन, मनोरंजन आदींची जणू फॅशनच झाली आहे. मात्र, यादिवशी आयुष्याला कलाटनी देणाऱ्या घटनाही अनेकदा घडतात. याकरीता पनवेलमधील सुकापुरात राकेश चंद्रकांत केणी (वय 26)या तरुणाने एक संदेशत्माक देखावा उभारला आहे. पनवेल परिसरात हा देखावा सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.

या देखाव्यात 31 डिसेंबरच्या सेलेब्रेशनच्या निमित्ताने मद्यपान केल्याने अनेक अपघात घडत असतात. त्यावेळी वाहन चालक मद्यपान करून आपल्याच अपघाताला निमत्रण देत असतो. याकरिता या तरुणाने आपल्या घरसमोरील मोकळ्या जागेत अनोखा संदेशात्मक देखावा उभारला आहे. त्यामध्ये दारू पिऊन वाहने चालवू नका, महिलांवरील अत्याचार थांबवा, द दारूचा नव्हे ..द दुधाचा, आदींसह झाडे लावा.. झाडे जगवा आदी संदेश देणारी फलकही लावले आहेत. हा देखावा उभारताना अपघातग्रस्त कारदेखील याठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे अशाप्रकारचे देखावे पोलीस ठीकठिकाणी उभारून नागरिकांना सतर्क करत असतात. मात्र, तरुण वयात एकीकडे तरुणांमध्ये पार्ट्यांचे बेत शिजत असताना दे धक्का ग्रुप व राकेश चंद्रकात केणी या तरुणाने उभारलेला देखावा खरोखरच कौतुकास्पद आहे.

दरवर्षी नाविन्यपूर्ण देखावे 
दरवर्षी राकेश केणी आपले वडील चंद्रकांत केणी यांच्या सहकार्याने नाविन्यपूर्ण देखावे उभारत असतात. पोलिसांमार्फत 31 डिसेंबरच्या निमित्ताने सर्वत्र जनजागृती केली जात असते. त्यांच्या अवाहनाला प्रतिसाद देत राकेश केणी अनोखा देखावा उभारतात. हा संदेशात्मक देखावा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी सुकापूर येथे पहावयास मिळत आहे.
 

Web Title: 'The Accidental Scene', a December 31 awareness message for partygoers in panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.