वाशी रेल्वे पुलावर अपघात
By Admin | Updated: November 2, 2015 02:17 IST2015-11-02T02:17:22+5:302015-11-02T02:17:22+5:30
पामबीच मार्गावर वाशी रेल्वे पुलावर रविवारी रात्री अपघाताची घटना घडली. उभ्या असलेल्या वाहनावर पाठीमागून आलेली वाहने धडकल्याने हा अपघात घडला

वाशी रेल्वे पुलावर अपघात
नवी मुंबई : पामबीच मार्गावर वाशी रेल्वे पुलावर रविवारी रात्री अपघाताची घटना घडली. उभ्या असलेल्या वाहनावर पाठीमागून आलेली वाहने धडकल्याने हा अपघात घडला. सुदैवाने अपघातामध्ये जीवितहानी टळली असून अपघातामुळे त्याठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.
रविवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास पामबीच मार्गावर वाशी रेल्वेपुलावर हा अपघात झाला. वाशीच्या दिशेने येणारी वाहने एकमेकांवर आदळून हा अपघात झाला. सुदैवाने अपघातामध्ये कोणीही गंभीर जखमी झालेले नसले तरी पाच वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बंद पडलेली एक कार पुलावर उभी असताना पाठीमागून आलेली भरधाव कार धडकली. यामुळे एकापाठोपाठ येणारी इतर पाच वाहने एकमेकांवर आदळली. पुलावरच झालेल्या या अपघातामुळे पामबीच मार्गावरून वाशीकडे जाणाऱ्या मार्गावर सुमारे अर्धा तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता. (प्रतिनिधी)