शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सायन-पनवेल महामार्गावर खड्ड्यांमुळे अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 00:32 IST

शिरवणेमधील प्रकार; खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहतुकीलाही अडथळा

नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावर शिरवणे पुलाजवळ मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे चालकांचा गाडीवरून ताबा सुटून अपघात होत आहे. वारंवार वाहतूककोंडीही होत असून या समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्यामुळे प्रवासी वाहतूकदारांमध्ये असंतोष निर्माण होत आहे.

महामार्गावरील वाहतूककोंडी थांबविण्यासाठी व अपघात कमी करण्यासाठी शासनाने महामार्गाचे रुंदीकरण केले आहे; परंतु ठेकेदाराने अनेक ठिकाणी कामे पूर्ण केली नसल्यामुळे व काही ठिकाणी निकृष्ठ काम झाल्यामुळे वाहतुकीची समस्या गंभीर होऊ लागली आहे.अर्धवट अवस्थेत असलेल्या कामांमध्ये शिरवणेमधील पुलाच्या बाजूच्या मार्गिकेचा समावेश आहे. वाशीच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. जवळपास एक फुटापेक्षा जास्त खोलीचे खड्डे आहेत.

खड्ड्यांमध्ये पाणी साचलेले असल्यामुळे वाहनचालकांना त्याचा अंदाज येत नाही. मोटारसायकलचा वारंवार अपघात होत आहे. खड्ड्यामध्ये आदळून मोटारसायकलस्वार खड्ड्यात कोसळू लागले आहेत. कार व इतर वाहनांचेही खड्ड्यांमुळे नुकसान होत आहे. सकाळी व सायंकाळी रोडवर वाहतूककोंडी होऊ लागली आहे. रोजच हा त्रास होत असल्यामुळे येथून प्रवास करणाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होऊ लागला आहे.

शिवसेनेचे इंदिरानगरमधील विभागप्रमुख महेश कोठीवाले यांनी याविषयी महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. या ठिकाणी खड्ड्यांमुळे गंभीर अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने येथे काँक्रीटचा रोड करावा. कायमस्वरूपी हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी केली आहे. येथे अपघात झाल्यास त्याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

टॅग्स :Accidentअपघात