जेसीबी चालकाच्या चुकीमुळे अपघात ?
By Admin | Updated: December 9, 2014 02:13 IST2014-12-09T02:13:56+5:302014-12-09T02:13:56+5:30
कोकण रेल्वेमार्गावर रविवारी झालेला अपघात हा जेसीबी चालकाच्या चुकीमुळे झाला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

जेसीबी चालकाच्या चुकीमुळे अपघात ?
कणकवली : कोकण रेल्वेमार्गावर रविवारी झालेला अपघात हा जेसीबी चालकाच्या चुकीमुळे झाला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून या अपघाताची चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक भानुप्रसाद तायल यांनी म्हटले आहे.
कोकण रेल्वेमार्गावरील बोर्ड वे पुलानजीक जनशताब्दी एक्स्प्रेसवर रविवारी जेसीबी कोसळून 16 प्रवासी जखमी झाले होते. तायल यांनी उपजिल्हा रुग्णालयात जखमींची विचारपूस केली. ते म्हणाले, ट्रेलरमधून जेसीबी घेऊन जाणो आवश्यक आहे. मात्र तसे झाले नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. अपघातातील किरकोळ जखमींना 5 हजार तर गंभीर जखमींना 25 हजार तातडीने मदत देण्यात आली आहे. जखमी प्रवाशांना भेटण्यासाठी येणा:या कुटुंबीयांना मोफत रेल्वे पास देण्यात येत असून, नातेवाइकांची निवासाची व्यवस्था रेल्वेच्यावतीने हॉटेलमध्ये केल्याचेही तायल यांनी सांगितले. (वार्ताहर)